sakal

बोलून बातमी शोधा

टीम धोनीचा अस्त? नऊ दिवसात ३ जिवलग मित्रांची निवृत्ती

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या तीन सहकारी खेळाडूने सप्टेंबर महिना निवृत्ती घेतली. गेल्या 9 दिवसांत धोनीच्या तीन स्टार खेळाडूंनी एक एक करून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीचा एक जिवलग मित्र सुरेश रैनाही यात आहे. सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण यावेळी त्याने क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर रैना आयपीएल आणि उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. मागील आयपीएल 2022 हंगामात रैनाला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नव्हते.

रैनानंतर मध्य प्रदेश संघासाठी रणजी करंडक जिंकणारा स्टार वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे याने १२ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

आता 14 सप्टेंबर रोजी आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून क्रिकेट खेळणारा स्टार सलामीवीर रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. उथप्पा 2007 टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य होता. तो 2015 मध्ये शेवटचा सामना खेळला होता.