MSRTC ची पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC ची पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू

shivai bus MSRTC

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ची पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' आज प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात आली. पुणे ते अहमदनगर अशी ही बस Electric Bus धावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पुणे येथे पार पडला आहे. ही महाराष्ट्रातली पहिली इलेक्ट्रीक बस आहे.

जाणून घेऊ या "शिवाई" ई-बसची वैशिष्ट्ये अन सोबत तिचे खास फोटो ...

१)शिवाई या बसच्या दररोज ६ फेऱ्या केल्या जाणार आहेत. या गाडीचे भाडे २७० रुपये असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
२)शिवाईमध्ये एकाच वेळेस ४३ प्रवासी प्रवास करु शकतात. ही बस १२ मीटर लांब आहे.
३)शिवाईचा वेग ताशी ८० किलोमीटर असा आहे.

१)शिवाई या बसच्या दररोज ६ फेऱ्या केल्या जाणार आहेत. या गाडीचे भाडे २७० रुपये असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. २)शिवाईमध्ये एकाच वेळेस ४३ प्रवासी प्रवास करु शकतात. ही बस १२ मीटर लांब आहे. ३)शिवाईचा वेग ताशी ८० किलोमीटर असा आहे.

१ जून १९४८ रोजी पुणे अहमदनगर मार्गावर पहिली राज्य शासनाची बस धावली होती.त्या बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवाटे यांनी शिवाई बसला हिरवा कंदील दाखवला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही देशातली सर्वात मोठी लोकांची वाहतूक करणारी सेवा आहे. ही सेवा तोट्यात चालल्याचं सांगितलं जातं. मात्र MSRTC कडे १६ हजार बसचा ताफा आहे. या बस दररोज ६५ लाख प्रवासी ने-आण करतात. करोनाच्या काळात मात्र या बससेला चांगलाच फटका बसला.

१ जून १९४८ रोजी पुणे अहमदनगर मार्गावर पहिली राज्य शासनाची बस धावली होती.त्या बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवाटे यांनी शिवाई बसला हिरवा कंदील दाखवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही देशातली सर्वात मोठी लोकांची वाहतूक करणारी सेवा आहे. ही सेवा तोट्यात चालल्याचं सांगितलं जातं. मात्र MSRTC कडे १६ हजार बसचा ताफा आहे. या बस दररोज ६५ लाख प्रवासी ने-आण करतात. करोनाच्या काळात मात्र या बससेला चांगलाच फटका बसला.

*शिवाई इलेक्ट्रिक बसचे खास वैशिष्ट्य 
१)प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाची विजेवर धावणारी पहिली वातानुकूलित ‘शिवाई’ बस प्रवाशांच्या सेवेत आणली आहे. 
२)या बसचा रस्त्यावर धावतांना आवाजही येत नाही. 
३)शिवाई या बसमध्ये अपंगांसाठी वेगळा रॅम्प आहे.
त्यासोबत  ही बस जीपीएसयुक्त आहे .
४)आपत्कालीन सुचना देण्यासाठी बटणांणी सुध्दा सोय या बसमध्ये करण्यात आली आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे  सुरक्षेसाठी या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा आणि सुरक्षेच्या अन्य सुविधांही उपलब्ध आहेत.

*शिवाई इलेक्ट्रिक बसचे खास वैशिष्ट्य १)प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाची विजेवर धावणारी पहिली वातानुकूलित ‘शिवाई’ बस प्रवाशांच्या सेवेत आणली आहे. २)या बसचा रस्त्यावर धावतांना आवाजही येत नाही. ३)शिवाई या बसमध्ये अपंगांसाठी वेगळा रॅम्प आहे. त्यासोबत ही बस जीपीएसयुक्त आहे . ४)आपत्कालीन सुचना देण्यासाठी बटणांणी सुध्दा सोय या बसमध्ये करण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेसाठी या बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा आणि सुरक्षेच्या अन्य सुविधांही उपलब्ध आहेत.

एका कंपनीकडून प्रथम ५० ‘शिवाई’ बस घेण्यात येतील.त्यानंतर आणखी १०० ‘शिवाई’ बस येत्या ऑगस्टपर्यंत ताफ्यात समाविष्ट होतील. अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दिल्ली सरकारच्या ई-बसला दिल्लीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे .
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 24 मे रोजी 150 ई-बसना हिरवा झेंडा दाखवला होता.

एका कंपनीकडून प्रथम ५० ‘शिवाई’ बस घेण्यात येतील.त्यानंतर आणखी १०० ‘शिवाई’ बस येत्या ऑगस्टपर्यंत ताफ्यात समाविष्ट होतील. अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्ली सरकारच्या ई-बसला दिल्लीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे . दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 24 मे रोजी 150 ई-बसना हिरवा झेंडा दाखवला होता.

या दरम्यान केजरीवाल सरकारने 24 ते 26 मे या कालावधीत प्रत्येकासाठी ई-बसवर मोफत प्रवासाची घोषणा केली होती. 
दिल्लीतील उच्चपदस्थांसह आमदारांनी गेल्या तीन दिवसांत ई-बसमध्ये प्रवास करून सुविधांचा आढावा घेतला. 

दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार, ''24, 25 आणि 26 मे या तीन दिवसात सुमारे एक लाख लोकांनी इलेक्ट्रिक बसमधून मोफत प्रवास केला आहे.
त्यापैकी 40 टक्के महिला आहेत. ज्यामध्ये 24 मे रोजी पहिल्या दिवशी सुमारे 12 हजार लोकांनी प्रवास केला. 25 मे रोजी सुमारे 28 हजार लोकांनी प्रवास केला. यासोबतच २६ मे रोजी जवळपास ५२ हजार लोकांनी मोफत प्रवास केला.

या दरम्यान केजरीवाल सरकारने 24 ते 26 मे या कालावधीत प्रत्येकासाठी ई-बसवर मोफत प्रवासाची घोषणा केली होती. दिल्लीतील उच्चपदस्थांसह आमदारांनी गेल्या तीन दिवसांत ई-बसमध्ये प्रवास करून सुविधांचा आढावा घेतला. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार, ''24, 25 आणि 26 मे या तीन दिवसात सुमारे एक लाख लोकांनी इलेक्ट्रिक बसमधून मोफत प्रवास केला आहे. त्यापैकी 40 टक्के महिला आहेत. ज्यामध्ये 24 मे रोजी पहिल्या दिवशी सुमारे 12 हजार लोकांनी प्रवास केला. 25 मे रोजी सुमारे 28 हजार लोकांनी प्रवास केला. यासोबतच २६ मे रोजी जवळपास ५२ हजार लोकांनी मोफत प्रवास केला.

go to top