- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
PHOTO : रानात उगवणारी अळंबी बनतेय रोजगाराचं साधन


नैसर्गिक उत्पादित होणाऱ्या अळंबी व रानभाज्या या चविष्ट आणि स्वादिष्ट असल्याने त्याला शहरात मोठी मागणी असून त्यांच्या विक्रीतून आर्थिक लाभ मिळतो आहे.मोठा पाऊस झाला की, रानात अळंबी जमिनीतून वर उगवते. ती शोधून काढणे कसबीचे काम असते.

या वेळी पावसाचा जोर ओसरल्याने अळंबी फुटली नाही; मात्र दोन दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अळंबीची उगवण झाली आहे. तालुक्यात रोजगाराच्यानिमित्ताने आदिवासी समाजातील अनेक कुटुंबे रानातील डोंगर पठारावर झोपड्या बांधून राहत आहेत.

पहाटे लवकर जंगलात जाऊन त्याचा शोध घेण्यात येतो. गवताचे प्रमाण व उंची वाढल्याने त्यातून अळंबीच्या कळ्या शोधून काढाव्या लागत आहेत; मात्र माहितगार बरोबर शोध घेऊन त्या काढून घेत आहेत. स्थानिक शेतकरीही या कामी पुढे आहेत.

दोन तासांत टोपलीभर अळंबी जमा करून त्याची मुख्य रस्त्याशेजारी, शहरातील बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे तसेच तालुक्यातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी अळंबी विक्री होताना दिसून येत आहे.

100 ते 150 रूपयांना वाटा लावून आदिवासी महिला त्याची विक्री करताना दिसून येत आहेत. मंडणगड बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अळंबीची विक्री होत असून खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे.

तास दोन तासात आणलेल्या अळंबीची विक्री होऊन त्यातून हजार ते दीड हजार रूपयांचे उत्पन्न पदरी पडत आहे. रानात उगवणाऱ्या नैसर्गिक भाज्यांना चांगली मागणी असून नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.

भारगी, टाकला, कालेरी, धांडगी, पोकला, मयाळू, तेरी, काटल अशा पावसातील रानटी भाज्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे खवय्यांना विविध भाज्यांचा स्वाद चाखायला मिळतो आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.