राणेंच्या अटकेनंतरही बालेकिल्यात जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद

रत्नागिरी: मारुती मंदिर येथे राणेंचे स्वागत करताना भाजप पदाधिकारी
रत्नागिरी: मारुती मंदिर येथे राणेंचे स्वागत करताना भाजप पदाधिकारीsakal

सिंधुदु्र्ग: केंद्रीय मंत्री पद मिळालेले भाजपचे चार नेते महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. मात्र त्यापैकी वादाच्या भोवऱ्यात सापडली ती नारायण राणे यांची यात्रा. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राणे यांना अटक झाली. आणि राणेंची जन आशीर्वाद यात्रा खळबळजनक ठरली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत नारायण राणे रत्नागिरी, सिंधुदु्र्गात दाखल झाले.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान जमलेले नेते आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना कार्यालयात जमलेले नेते, कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 35 तसेच कलम 188, 143 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी ही खळबळजनक राणेंची जन आशीर्वाद यात्रा आज पार पडली. त्याची काही छायाचित्रे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com