PHOTO : सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचं देशभर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचं देशभर आंदोलन

Congress nationwide agitation in support of Sonia Gandhi

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED नं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना समन्स बजावलंय.

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणाची (National Herald Case) अंमलबजावणी संचालनालय (ED) पुन्हा चौकशी करत आहे. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना समन्स बजावण्यात आलंय. यापूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आली आहे.

तर, दुसरीकडं काँग्रेसनं पुन्हा एकदा देशभरात ताकद दाखविण्याची घोषणा केलीय. त्याअंतर्गत आज दिल्ली, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुण्यामध्ये काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं. केंद्रातील मोदी सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणेचा गैर वापर करत असल्याचा आरोप करत पुणे शहर काँग्रेसकडून (Congress) आंदोलन करण्यात आलं.

आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती.

दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी केल्यामुळं काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत निदर्शनं केली.

पाटणा : देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून सोनिया गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

राजस्थान : सोनिया गांधी यांचं व्यक्तिमत्व आणि त्या ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असल्यानं ईडीनं त्यांच्या घरी चौकशीसाठी जायला हवं होतं - मुख्यमंत्री अशोक गेहलोत

बंगळुरू : सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीच्या विरोधात कर्नाटक काँग्रेसनं डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वात निदर्शनं केली.

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीनं समन्स बजावलेल्या सोनिया गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांनी निदर्शनं केली.