sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगडाचा सर्वांगीण विकास आराखडा करण्याच्या वन विभागाला सूचना

सिंहगडाचा सर्वांगीण विकास आराखडा करण्याच्या वन विभागाला सूचना

खडकवासला : सिंहगडाचा शिवस्पर्श लाभलेल्या गडावरील इतिहास जाणून घेत, गडाचे पावित्र्य जपत, ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करून निसर्गप्रेमी, गडप्रेमी, देशविदेशातील पर्यटकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोमवारी सिंहगडाची पाहणी केली. सर्वांगीण विकास आराखडा करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडला जाणार आहे.

खासदार सुळे यांनी सिंहगडावरील प्रत्येक वास्तुंचा, मंदिर, वाटा, स्मारकांचा इतिहास त्यांनी सिंहगडचे अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते यांच्याकडून जाणून घेतला. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याशी ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करून निसर्गप्रेमी, गडप्रेमी, देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध उपाययोजना, सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चा केली. सुमारे तीन तास त्या गडावर पाहणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले, माजी सरपंच राजेंद्र डिंबळे खुशाल करंजावणे सोबत उपस्थित होते.

विकास आराखड्यातील कामांचे प्रामुख्याने एक, तीन व पाच वर्ष अशी वर्गीकरण करावीत. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुर्गप्रेमी आणि स्थानिकांच्या मागण्यांचा याचा एकत्रित विचार करुन,  देश विदेशातील पर्यटकांची, दुर्गप्रेमींची पावले सिंहगडावर येण्यासाठी आणि  सिंहगडाचा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याविषयी प्राथमिक चर्चा करण्यात आली. यावर पुरातत्व, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन विकास मंडळ यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला जाईल.

गडाची माहिती देणारे गाईड, येथील इतिहास नाटिका स्वरूपात मांडला जावा. यासह स्वच्छ व सुंदर सिंहगडासाठी आणि त्याच्या पर्यटनातून स्थानिकांना रोजगार निर्माण होण्यासाठी खासदार सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. शिवप्रेमी, सिंहगडप्रेमींच्या मनातील सिंहगडाचा विकास लवकरच पाहायला मिळेल. 
सिंहगडावर जिल्हा परिषदेची जागा आहे. या ठिकाणी ऐतिहासिक परिसराला साजेसे अशी विश्रामगृहाची वास्तू साकारावी अशी सूचना खासदार सुळे यांनी केली.

गडाची माहिती देणारे गाईड, येथील इतिहास नाटिका स्वरूपात मांडला जावा. यासह स्वच्छ व सुंदर सिंहगडासाठी आणि त्याच्या पर्यटनातून स्थानिकांना रोजगार निर्माण होण्यासाठी खासदार सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. शिवप्रेमी, सिंहगडप्रेमींच्या मनातील सिंहगडाचा विकास लवकरच पाहायला मिळेल. सिंहगडावर जिल्हा परिषदेची जागा आहे. या ठिकाणी ऐतिहासिक परिसराला साजेसे अशी विश्रामगृहाची वास्तू साकारावी अशी सूचना खासदार सुळे यांनी केली.

कल्याण दरवाजा, तान्हाजी कडा, सिंहगड, राजगड पायवाट, गडाभोवतीची मेटं याविषयी सांगितलेल्या माहितीने सुप्रियाताई भारावल्या.

कल्याण दरवाजा, तान्हाजी कडा, सिंहगड, राजगड पायवाट, गडाभोवतीची मेटं याविषयी सांगितलेल्या माहितीने सुप्रियाताई भारावल्या.

'मी पुन्हा एकदा खास वेळ काढून येईन आणि सिंहगडाचा सविस्तर इतिहास तुमच्याकडून जाणून घेईन' असा शब्द देत 'सिंहगडाच्या विकासाबाबतच्या विविध उपक्रमासाठी तुमची सहकार्य राहु द्या.' अशी भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. 
-नंदकिशोर मते, सिंहगड अभ्यासक

'मी पुन्हा एकदा खास वेळ काढून येईन आणि सिंहगडाचा सविस्तर इतिहास तुमच्याकडून जाणून घेईन' असा शब्द देत 'सिंहगडाच्या विकासाबाबतच्या विविध उपक्रमासाठी तुमची सहकार्य राहु द्या.' अशी भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. -नंदकिशोर मते, सिंहगड अभ्यासक

टॅग्स :pune