कृषी क्षेत्रातील दोन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये कर्नाटकमधील 'टनेल मॅन' (Tunnel Man) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ७२ वर्षाच्या 'अमई महालिंगा नाईक' या शेतकऱ्याला शेतात उभारलेल्या सिंचन व्यवस्थेबद्दल हा पुरस्कार जाहीर झालाय. कोण आहेत 'अमई महालिंगा नाईक'? जाणून घेऊया...(Mahalinga Naik Inspiration Story)
त्याच्याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
कर्नाटकमधील अमई महालिंगा नाईक यांनी डोंगरावरील माळरानावर बोगदा खोदून पाणी उपलब्ध केले आणि या ओसाड जमीनीवर बाग फुलवली आहे. या कार्याचा गौरव करत सरकारने त्यांना पद्मश्री जाहीर केलाय.
शेतमजुरी करणाऱ्या नाईक यांनी भेट म्हणून मिळालेल्या शेतीत पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी डोंगरावर बोगदे खोदायला सुरुवात केली.
त्यांनी २०-२० फूटाचे खोदलेले जवळपास ४ बोगदे कोसळले, तरीही नाईक खचले नाहीत. त्यांनी जिद्दीने आपले काम चालू
ठेवले. ते अंधारातसुद्धा हे काम करत असत.
दिवसभर मालकाच्या शेतात रोजंदारीवर राबायचं आणि काम संपलं की बोगदा खोदायला जायचं असा दिनक्रम नाईक यांचा चालू असायचा. रात्री उशीर होतो म्हणून ते वातीचा दिवा आणि रॉकेलची चिमणी लावून काम करायचे.
रात्री ९ वाजेपर्यंत त्यांचं खोदायचं काम चालू असायचं.
अनेकदा बोगदे कोसळूनही त्यांनी हार मानली नाही. अखेर ६ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या एका बोगद्याला पाणी लागले.
त्यानंतर त्यांनी ते पाणी सुपारीच्या झाडाच्या खोडाच्या साहाय्याने शेतापर्यंत आणले आणि साठवण्यासाठी एक हौद बनवला.
त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ओसाड शेतात सुपारी, नारळ. काजूची बाग फुलवली आहे. त्यांनी सिंचनाची वेगळी पद्धत शोधून काढली. त्यानंतर त्यांना 'टनेल मॅन' म्हणून लोकं ओळखू लागले. त्यांची ही कहानी अनेकांना प्रेरणा देत राहील.
त्यांच्या या कार्याचा गौरव करत केंद्र सरकारने २०२२ सालचा कृषी क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार अमई महालिंगा नाईक यांना जाहीर केलाय.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.