Shivkumar Sharma: संतुरवादनाची अवीट गोडी जाणकार श्रोत्यांपर्यत (Santoor Instrument) पोहचविणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यानं भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांचं जाणं हे भारतातील (Indian Music) ख्यातनाम संगीतकारांना धक्का देणारं आहे. अथक संघर्ष, परिश्रम यामुळे शिवकुमार शर्मा यांची जगानं दखल घेतली. संतुरच्या अनवट सुरांनी श्रोत्यांना तजेलदापणाचा अनुभव देण्याची ताकद शिवकुमार शर्मा यांच्या संतुरवादनात होती. त्यांनी अखेरपर्यत आपल्या संगीतविचार श्रोत्यांपर्यत पोहचवला. केवळ वादनच नव्हे तर संतुरवादनात उत्तमोउत्तम शिष्य घडवण्याचा ध्यास होता. त्यांनी तो पूर्ण केला.
जगभरातील अनेक मानाच्या संगीत महोत्सवामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील त्यांच्या संतुरवादनानं श्रोते मुग्ध झाले होते.
13 जानेवारी 1938 मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मुमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उमा दत्त शर्मा असे होते. ते गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी शिवकुमार यांनी वडिलांकडून गायनाचे धडे घेतले. तर 13 व्या वर्षांपासून संतुरवादन शिकण्यास सुरुवात केली.
भारतीय वादयसंगीतात संतुरवादनाची गोष्ट काही वेगळीच आहे. त्याची लय, नाद हा मुग्ध करणारा आहे. पंडितजींना यावाद्याविषयी विशेष जिव्हाळा निर्माण झाला तो य़ामुळेच. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षांपर्यत जपला. संतुरवादनाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारे संगीतकार म्हणून शिवकुमार शर्मा यांचे नाव घेता येईल.
पंडितजींनी मुंबईमध्ये 1955 मध्ये पहिल्यांदा संतुरवादनाचा जाहीर कार्यक्रम घेतला. त्याला त्यांच्या अपेक्षेपेक्षाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. 1960 मध्ये शिवकुमार यांनी आपला पहिला सोलो अल्बम रिलिज केला होता.
कालांतरानं पंडितजींनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया यांच्यासोबत संतुरवादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या वेगवेगळ्या मैफलींना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. 1967 मध्ये त्यांनी त्यांच्यासोबत वेगळा अल्बम रेकॉर्ड केला.
कॉल ऑफ द व्हॅली या अल्बमला केवळ भारताच नाहीतर जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. भारतीय संगीत विश्वामध्ये आतापर्यत ज्या म्युझिक अल्बमची सर्वाधिक विक्री झाली त्यामध्ये कॉल ऑफ द व्हॅलीचा समावेश आहे.
शास्त्रीय संगीतामध्ये पंडितजींनी उत्तम कामगिरी केली असे नाही तर त्यांनी अनेक भारतीय चित्रपटांना देखील संगीत दिले. याही वेळेस त्यांच्यासोबत हरिप्रसाद चौरासिया होते. त्यांची जोडी भारतीय संगीतविश्वामध्ये लोकप्रिय झाली होती. शिवहरी या नावानं ते संगीत देत. चांदनी, डर, फासले या चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत लोकप्रिय झालं.
संतुरवादनाची अवीट गोडी जाणकार श्रोत्यांपर्यत (Santoor Instrument) पोहचविणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यानं भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.