संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात....

Tuesday, 5 January 2021

पिंपरी- महामेट्रोतर्फे नुकतीच मागच्या रविवारी मोरवाडी ते फुगेवाडी अशी यशस्वी ट्रायल रन घेण्यात आली. लॉक डाउननंतर  मेट्रोचे काम रात्रं दिवस अविरतपणे सुरु आहे. शहरातील सर्वात मोठे मेट्रोचे स्टेशन हे संत तुकारामनगर मध्ये होत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून साधारण ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. स्टेशनच्या बाहेरील बाजूच्या डिझाइनचे काम पूर्ण होत आले असून तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल रूम, फूट ओव्हर ब्रिज, सरकता जिना, प्लॅटफॉर्म तसेच डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून ते ही काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. स्टेशनच्या शेजारीच सायकल, अंध नागरिक व पादचाऱ्यांसाठी वेगळा मार्ग बनविण्यात आलेला आहे.

पिंपरी- महामेट्रोतर्फे नुकतीच मागच्या रविवारी मोरवाडी ते फुगेवाडी अशी यशस्वी ट्रायल रन घेण्यात आली. लॉक डाउननंतर  मेट्रोचे काम रात्रं दिवस अविरतपणे सुरु आहे. शहरातील सर्वात मोठे मेट्रोचे स्टेशन हे संत तुकारामनगर मध्ये होत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून साधारण ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. स्टेशनच्या बाहेरील बाजूच्या डिझाइनचे काम पूर्ण होत आले असून तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल रूम, फूट ओव्हर ब्रिज, सरकता जिना, प्लॅटफॉर्म तसेच डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आले असून ते ही काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. स्टेशनच्या शेजारीच सायकल, अंध नागरिक व पादचाऱ्यांसाठी वेगळा मार्ग बनविण्यात आलेला आहे. त्याचीच ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)