हॉलिवूडचे डार्क सीक्रेट्स: कुणाला आंघोळीचा कंटाळा तर कुणाचे वडील होते चोर Hollywood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉलिवूडचे डार्क सीक्रेट्स: कुणाला आंघोळीचा कंटाळा तर कुणाचे वडील होते चोर

Hollywood Actors Dark Secrets
टोबी मॅग्वायर(Tobey Maguire)
स्पायडरमॅन अभिनेता टोबी मॅग्वायर याचे वडील बॅंकचोर होते. १९९३ मध्ये टोबीच्या वडीलांनी होमटाऊन रेसेडामध्ये एका बॅंकेत चोरी केली होती,आणि ते जेलमध्येही गेले होते.

टोबी मॅग्वायर(Tobey Maguire) स्पायडरमॅन अभिनेता टोबी मॅग्वायर याचे वडील बॅंकचोर होते. १९९३ मध्ये टोबीच्या वडीलांनी होमटाऊन रेसेडामध्ये एका बॅंकेत चोरी केली होती,आणि ते जेलमध्येही गेले होते.

 ब्रॅड पीट
सुपरस्टार ब्रॅड पीट हा सिनेसृष्टीत येण्याआधी एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. कोंबड्यासारखा दिसणारा कॉस्च्युम घालून तो तिथे रेस्टॉरंटची  प्रसिद्धी पत्रक वाटायचं काम करायचा.

ब्रॅड पीट सुपरस्टार ब्रॅड पीट हा सिनेसृष्टीत येण्याआधी एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. कोंबड्यासारखा दिसणारा कॉस्च्युम घालून तो तिथे रेस्टॉरंटची प्रसिद्धी पत्रक वाटायचं काम करायचा.

ख्रिस हेम्सवर्थ 
हॉलीवूडचा 'थॉर' म्हणून ओळखला जाणारा ख्रिस हेम्सवर्थ हा ब्रेस्ट मिल्क ज्या पंपानं काढतात त्याला स्वच्छ करण्याचं काम एकेकाळी करत होता. एका मुलाखतीत आपल्याला या नोकरीचा तिटकारा वाटायचा असं सांगितलं होतं.

ख्रिस हेम्सवर्थ हॉलीवूडचा 'थॉर' म्हणून ओळखला जाणारा ख्रिस हेम्सवर्थ हा ब्रेस्ट मिल्क ज्या पंपानं काढतात त्याला स्वच्छ करण्याचं काम एकेकाळी करत होता. एका मुलाखतीत आपल्याला या नोकरीचा तिटकारा वाटायचा असं सांगितलं होतं.

मेगन फॉक्स
हॉलीवूडची सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेगन फॉक्सला टॉयलेटमध्ये फ्लश करायचं लक्षात राहत नाही. घरीच नाही तर दुसऱ्यांकडे गेली असताना देखील तिच्याकडनं ही चूक होते. तिनं एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती.

मेगन फॉक्स हॉलीवूडची सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेगन फॉक्सला टॉयलेटमध्ये फ्लश करायचं लक्षात राहत नाही. घरीच नाही तर दुसऱ्यांकडे गेली असताना देखील तिच्याकडनं ही चूक होते. तिनं एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती.

जेक जिलेनहॉल
हॉलीवूडचा सर्वात हॅंडसम हिरो समजला जाणारा जेक जिलेनहॉलला आंघोळ करायला आवडत नाही. आंघोळ करणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं त्याला वाटतं. तो दात रोज घासतो पण आठवडा-आठवडा आंघोळ करत नसल्याचं त्यानं एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

जेक जिलेनहॉल हॉलीवूडचा सर्वात हॅंडसम हिरो समजला जाणारा जेक जिलेनहॉलला आंघोळ करायला आवडत नाही. आंघोळ करणं म्हणजे वेळ वाया घालवणं असं त्याला वाटतं. तो दात रोज घासतो पण आठवडा-आठवडा आंघोळ करत नसल्याचं त्यानं एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

चार्लीज थेरोन
हॉलीवूड अभिनेत्री चार्लीज थेरोनचं एक सीक्रेट २००४ मध्ये सर्वांसमोर आलं होतं. ती १५ वर्षांची असताना तिच्या आईनं दारुड्या वडीलांचा खून केला होता.  पण हे कृत्य तिच्या आईनं स्वतःचा बचाव करण्यासाठी केलं होतं म्हणून त्यांना कोणतीही शिक्षा झाली नव्हती. असं असलं तरी अभिनेत्री या गोष्टीचा उल्लेख निघाला की बोलायचं टाळते.

चार्लीज थेरोन हॉलीवूड अभिनेत्री चार्लीज थेरोनचं एक सीक्रेट २००४ मध्ये सर्वांसमोर आलं होतं. ती १५ वर्षांची असताना तिच्या आईनं दारुड्या वडीलांचा खून केला होता. पण हे कृत्य तिच्या आईनं स्वतःचा बचाव करण्यासाठी केलं होतं म्हणून त्यांना कोणतीही शिक्षा झाली नव्हती. असं असलं तरी अभिनेत्री या गोष्टीचा उल्लेख निघाला की बोलायचं टाळते.

मिला कुनिस आणि एश्टन कचर 
हॉलीवूड स्टार कपल मिला कुनिस आणि एश्टन कचर यांनी साबण आणि आंघोळीविषयी एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते.आम्ही फक्त काखेत आणि प्रायव्हेट पार्टला साबण लावून स्वच्छ करतो. याव्यतिरिक्त सर्व शरीराला साफ नाही करत. मिलानंदेखील ती दिवसातून फक्त दोनदा चेहरा धुते म्हटलं होतं. आणि आपल्या मुलांना देखील रोज आंघोळ घालत नाही असं देखील सांगितलं होतं.

मिला कुनिस आणि एश्टन कचर हॉलीवूड स्टार कपल मिला कुनिस आणि एश्टन कचर यांनी साबण आणि आंघोळीविषयी एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते.आम्ही फक्त काखेत आणि प्रायव्हेट पार्टला साबण लावून स्वच्छ करतो. याव्यतिरिक्त सर्व शरीराला साफ नाही करत. मिलानंदेखील ती दिवसातून फक्त दोनदा चेहरा धुते म्हटलं होतं. आणि आपल्या मुलांना देखील रोज आंघोळ घालत नाही असं देखील सांगितलं होतं.

go to top