Sat, May 21, 2022
PHOTO : राष्ट्रपती नियुक्त खासदार ते नव्या संघटनेची घोषणा; संभाजीराजेंचा राजकीय प्रवास
Published on : 12 May 2022, 7:52 am
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे (Chatrapti Sambhaji Raje) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत नव्या संघटनेची घोषणा केली आहे. या बरोबरच त्यांनी समाजासाठी कामे करण्यासाठी येत्या काही दिवसात होणारी राज्यसभा खासदारकीची निवडणूक लढवणार असून ही निवडणूक आपण अपक्ष लढणार अल्याचे संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेचीदेखील घोषणा केली. ही संघटना राजकीय पक्ष झाला तरी त्याला हरकत नसावी. हा पहिला टप्पा आहे, असं म्हणत त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वीदेखील संभाजीराजे विविध गोष्टींमुळे चर्चेत आले त्याचा घेतलेला हा छोटासा आढावा. (SambhajiRaje Announced New Unioun )