उत्तराखंडमधील पूर्वेची शान म्हटलं जाणारं पिठोरागड म्हणजे ऐतिहासिक (Historical) पार्श्वभूमी लाभलेलं अत्यंत देखणं असं निसर्गरम्य ठिकाण! पर्वतराजीत वसलेली छोटी देखणी टुमदार घरं, दुरून टप्प्याटप्प्यांसारखी दिसणारी उंचावरील गवताळ कुरणं आणि एकूणच सारं वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य...या ठिकाणाची खास मनमोहक दृश्ये... (Pithorgarh is a famous Historical and tourism place in Uttarakhand)
केवळ बघत राहावं असं! शिवाय इथे आहे, कैलास-मानसरोवर सारख्या पवित्र यात्रांच्या ट्रेकचे ‘स्टार्टिंग पॉइंट’’.
इतकंच नव्हे तर, नंदादेवी, नेपाळचे अप्पी आणि पांचचुली या अलौकिक शिखरांचं दुरून पण स्वच्छ मस्त दर्शनही इथून होतं.
पिठोरागड किल्ला, अस्कॉट अभयारण्य, आणि काफनी ग्लेशियर ट्रॅक सारखी लोकप्रिय पर्यटन स्थळंही इथेच आहेत.
याशिवाय हायकिंग, स्किईंग, कयाकिंग, कॅनॉईंग आणि फिशिंग सारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजही इथे करण्यासारख्या आहेत!
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.