Presidential Election | PHOTOS: राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास बघा, शिवसेनेने आपला पॅटर्न कायम राखलाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS: राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास बघा, शिवसेनेने आपला पॅटर्न कायम राखलाय

Presidential Election Draupadi Murmu
शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना सावध भूमिकेत दिसून येत आहे. अशातच आता शिवसेना राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र ही काही पहिली वेळ नाही. याआधीही शिवसेनेने अशाच प्रकारची भूमिका घेतली आहे. जाणून घ्या इतिहास...

२००२ - अब्दुल कलाम यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता.

२००७ - प्रतिभा पाटील राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या महिला उमेदवार तसंच मराठी असल्याचं सांगत बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना समर्थन दिलं होतं. एनडीएमध्ये असूनही शिवसेनेने यूपीएच्या उमेदवाराला मतदान केलं होतं.

२०१२ - प्रणव मुखर्जींच्या वेळीही हेच झालं. एनडीएमध्ये असूनही शिवसेनेने युपीएच्या उमेदवाराला मत दिलं.

२०१७ - रामनाथ कोविंद यांनाही शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेना यावेळी सत्ताधारी एनडीएमध्येच होती, त्यांनी रामनाथ कोविंद यांनाच मत दिले.

२०२२ - यंदाच्या वर्षी शिवसेना एनडीएच्या बाहेर आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असूनही शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार आणि भाजपा नेत्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

go to top