Price Hike: मार्चपासून वाढलाय घरखर्च! सामान्यांना भेडसवणार प्रश्न

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे
Price Hike in march
Price Hike in march sakal
Updated on

या महिन्यापासून सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. आर्थिक वर्षासाठी महत्वाच्या असणाऱ्या मार्च महिन्यात अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम घरखर्चावर झाला आहे. परिणामी सामान्य कुटूंबातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या महिन्यात अशाप्रकारे दर वाढले आहेत.

पेट्रोल डिझेलचे दर - मंगळवारी पेट्रोल, डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलची किंमत आता ९५.४१ रूपयांच्या तुलनेत ९६.२१ रुपये प्रति लिटर असेल, तर डिझेलचे दर ८६.६७ रूपये प्रति लिटरवरून ८७.४७ रूपये झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ०.८४ रुपयांनी वाढून ११०.८२ रुपये, तर डिझेलचा दर ०.८६ रुपयांनी वाढून ९५ रुपयांवर पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत ते वाढण्याची शक्यता आहे
पेट्रोल डिझेलचे दर - मंगळवारी पेट्रोल, डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलची किंमत आता ९५.४१ रूपयांच्या तुलनेत ९६.२१ रुपये प्रति लिटर असेल, तर डिझेलचे दर ८६.६७ रूपये प्रति लिटरवरून ८७.४७ रूपये झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ०.८४ रुपयांनी वाढून ११०.८२ रुपये, तर डिझेलचा दर ०.८६ रुपयांनी वाढून ९५ रुपयांवर पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत ते वाढण्याची शक्यता आहेSakal
एलपीजी गॅसचे दर - एलपीजी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रति सिलिंडर ५० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये विनाअनुदानित एलपीजी गॅसची किंमत ९४९.५०  रुपये प्रति १४.२ किलो सिलेंडर आणि कलकत्तामध्ये ९७६ रुपये झाली आहे.जानेवारी २०१४ मध्ये विनाअनुदानित दर १२४१ रुपयांवर पोहोचला होता, परंतु त्या वेळी सरकारने ६०० रुपये प्रति सिलिंडर सबसिडी दिली होती, असे पीटीआयच्या अहवालात म्हटले आहे.
एलपीजी गॅसचे दर - एलपीजी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रति सिलिंडर ५० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये विनाअनुदानित एलपीजी गॅसची किंमत ९४९.५० रुपये प्रति १४.२ किलो सिलेंडर आणि कलकत्तामध्ये ९७६ रुपये झाली आहे.जानेवारी २०१४ मध्ये विनाअनुदानित दर १२४१ रुपयांवर पोहोचला होता, परंतु त्या वेळी सरकारने ६०० रुपये प्रति सिलिंडर सबसिडी दिली होती, असे पीटीआयच्या अहवालात म्हटले आहे.sakal
डिझेलचे दर- डिझेलच्या दरात मार्च महिन्यात सुमारे २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर हे मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांसाठी आहेत जे बॅकअप वीज निर्मितीसाठी डिझेल वापरतात, असा अहवाल पीटीआयने दिला आहे.
डिझेलचे दर- डिझेलच्या दरात मार्च महिन्यात सुमारे २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर हे मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांसाठी आहेत जे बॅकअप वीज निर्मितीसाठी डिझेल वापरतात, असा अहवाल पीटीआयने दिला आहे.sakal
CNG ची किंमत-  मार्चमध्ये दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो ०.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिल्लीतील एनसीटीमध्ये सीएनजीची किंमत ५६.५१ रुपयांवरून ५७.५१ रुपये प्रति किलो झाली आहे.
CNG ची किंमत- मार्चमध्ये दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो ०.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिल्लीतील एनसीटीमध्ये सीएनजीची किंमत ५६.५१ रुपयांवरून ५७.५१ रुपये प्रति किलो झाली आहे.Sakal
अमूल, मदर डेअऱी दूधाची किंमत वाढली- मार्चमध्ये अमूल, मदर डेअरीच्या दुधाचीही किंमत वाढली आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने (GCMMF) १ मार्चपासून देशभरात 'अमूल' दूध प्रति लिटर दोन रूपयांनी महागले आहे. अहमदाबाद, दिल्ली एनसीआर, कोलकाता आणि मुंबई मेट्रो मार्केटमध्ये फुल क्रीम दूध ६० रुपये प्रति लिटर, तर टोन्ड दूध अहमदाबादमध्ये ४८रुपये प्रति लिटर आणि दिल्ली एनसीआर, मुंबई आणि ५० रुपये प्रति लिटर आहे. तर मदर डेअरहीनेही दोन रूपायांनी दर वाढवले आहेत.
अमूल, मदर डेअऱी दूधाची किंमत वाढली- मार्चमध्ये अमूल, मदर डेअरीच्या दुधाचीही किंमत वाढली आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने (GCMMF) १ मार्चपासून देशभरात 'अमूल' दूध प्रति लिटर दोन रूपयांनी महागले आहे. अहमदाबाद, दिल्ली एनसीआर, कोलकाता आणि मुंबई मेट्रो मार्केटमध्ये फुल क्रीम दूध ६० रुपये प्रति लिटर, तर टोन्ड दूध अहमदाबादमध्ये ४८रुपये प्रति लिटर आणि दिल्ली एनसीआर, मुंबई आणि ५० रुपये प्रति लिटर आहे. तर मदर डेअरहीनेही दोन रूपायांनी दर वाढवले आहेत.
मॅगी, चहा, कॉफी- मॅगी मसाला नूडल्सच्या 70 ग्रॅम पॅकेटची किंमत पूर्वी १२ रूपये होती. ती आता १४ रूपये करण्यात आली आहे. तर १४० ग्रॅमच्या पॅकेटची किंमत ३ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. मॅगी मसाला नूडल्सच्या 560 ग्रॅम पॅकेटची किंमत आधी ९६ रूपये होती. ती आता १०५ रूपये झाली आहे. नेसकॅफे, ब्रू, ताजमहाल चहा आणि ब्रुक बाँड उत्पादनांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
मॅगी, चहा, कॉफी- मॅगी मसाला नूडल्सच्या 70 ग्रॅम पॅकेटची किंमत पूर्वी १२ रूपये होती. ती आता १४ रूपये करण्यात आली आहे. तर १४० ग्रॅमच्या पॅकेटची किंमत ३ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. मॅगी मसाला नूडल्सच्या 560 ग्रॅम पॅकेटची किंमत आधी ९६ रूपये होती. ती आता १०५ रूपये झाली आहे. नेसकॅफे, ब्रू, ताजमहाल चहा आणि ब्रुक बाँड उत्पादनांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.tea

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com