Wed, Feb 1, 2023
'थोडी तरी लाज बाळगा'; प्रियांका-निकच्या फोटोवर नेटकरी भडकले
Published on : 30 August 2021, 10:12 am
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती नेहमी शेअर करते.
नुकताच तिने पती निक जोनाससोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे.
लाल आणि काळ्या रंगाची बिकिनी, गॉगल अशा लूकमधील फोटो प्रियांकाने शेअर केला आहे.
प्रियांकाने शेअर केलेल्या निक जोनाससोबतच्या फोटोवर नेटकरी भडकले आहेत.
फोटोमध्ये निक आणि प्रियांकाने दिलेल्या पोजवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी प्रियांका आणि निकच्या फोटोवर कमेंट करून त्यांना सुनावले.
'जरा तरी लाज ठेवा', अशा कमेंट प्रियांका आणि निकच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.