Swara Bhasker: स्वरा भास्करचा नाद नाय! लग्नात 'या' बड्या राजकीय नेत्यांची हजेरी आणि..
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वीच आपला बॉयफ्रेंड फहाद अहमद सोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. कोर्ट मॅरेज केल्यानंतर अभिनेत्रीनं अगदी पारंपरिक हिंदू पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर स्वराने तिच्या निकटवर्तीयांसाठी खास रिसेप्शन आयोजित केलं होतं.
स्वराचा नवरा फहाद अहमद हा सामाजिक चळवळीमध्ये आणि राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय असतो.त्यामुळे राजकीय विश्वात त्याच्या नावाचा बराच राबता आहे. म्हणून या रिसेप्शनला अनेक बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
या रिसेप्शनला काँग्रेसचे राहुल गांधी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे देखील यावेळी उपस्थित होते.
कॉँग्रेसचे शशी थरूर हे देखल यावेळी आवर्जून आले होते.
तर खासदार आणि अभिनेत्री जय बच्चन यांनीही या सोहळ्याला येऊन नवं विवाहितांना शुभेच्छा दिल्या.