- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
PHOTO : आसाममध्ये हाहाकार; पुरात 71 जणांचा मृत्यू, 2 पोलिस पाण्यात बुडाले

Assam Rain Update : आसाममध्ये पूरस्थिती (Assam Floods) गंभीर होत चालली आहे. गेल्या 24 तासांत इथं पुरामुळं आणखी 9 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळं आसाममधील पुरातील मृतांचा आकडा 71 वर पोहोचलाय.

रविवारी पुरात सहा जणांचा मृत्यू झाला, तर तीन जणांचा भूस्खलनात मृत्यू झाला. तिन्ही भूस्खलनामुळं मृत्यू झाल्याची नोंद कछार जिल्ह्यात झालीय. तसंच किमान आठ जण बेपत्ता झाले आहेत.

मध्य आसाममधील नागांव जिल्ह्यातील कामपूर भागात रविवारी रात्री उशिरा दोन पोलिस (Assam Police), एक हवालदार आणि एक अधिकारी पुराच्या पाण्यात वाहून गेले.

कॉन्स्टेबलचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून बेपत्ता पोलीस अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. रविवारी संध्याकाळी राज्यातील पूरग्रस्तांची संख्या 42 लाखांवर गेलीय.

रविवारी, 19 जून रोजी मरण पावलेल्या 9 लोकांपैकी 3 मृत्यू कछार जिल्ह्यात, दोन बारपेटा आणि त्यानंतर बजली, कामरूप, करीमगंज, उदलगुरी जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यू झालाय.

संततधार पावसामुळं आलेल्या विनाशकारी पुरानं आसाममध्ये हाहाकार माजवला आहे. सुमारे 5,137 गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत.

बारपेटा हा सर्वाधिक बाधित जिल्हा असून, 12.76 लाख लोक बाधित झाले आहेत. यानंतर दरांगमध्ये सुमारे 3.94 लाख लोक बाधित झाले असून, नागावमध्ये 3.64 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसलाय.

आसाममधील 33 बाधित जिल्ह्यांपैकी बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोंगाईगाव, कछार, चिरांग, दरांग, धेमाजी, धुबरी, डिब्रुगढ, दिमा-हसाओ, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, होजई, जोरहाट, कामरूप (एम), कार्बी, पश्चिम, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर, तिनसुकिया आणि उदलगुरीला मोठा पुराचा फटका बसला आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.