Raj Thackeray Aurangabad | PHOTOS:बाळासाहेब ते राज; औरंगाबादच्याच भूमीतून झाला हिंदुत्वाचा एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS:बाळासाहेब ते राज; औरंगाबादच्याच भूमीतून झाला हिंदुत्वाचा एल्गार

Balasaheb and Raj Thackeray
महाराष्ट्रात भोंग्यांबद्दलच्या वादादरम्यानच आता राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या सभेत ते कोणती भूमिका मांडणार की त्यांच्या भोंग्याबद्दलच्या भूमिकेचाच पुनरुच्चार करणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

विशेष गोष्ट अशी की राज ठाकरेंनी या सभेसाठी निवडलेलं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान हे तेच आहे जिथे काही दशकांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनीही सभा घेतली होती.

याच सभेनंतर शिवसेनेला मराठवाड्यातही आपला विस्तार करणं शक्य झालं होतं.

बाळासाहेब ठाकरेंनी १९८८ साली हिंदुत्व कार्ड वापरण्यासाठी औरंगाबादमध्ये याच मैदानाची निवड केली होती. त्यांनी या सभेदरम्यान खान (मुस्लीम) की बाण(शिवसेनेचं चिन्ह) यापैकी एकच निवडण्याचं आवाहनही केलं होतं.

१९८० च्या आसपास शिवसेनेने मुंबई, ठाण्यातली आपली पकड तर मजबूत केलीच होती. पण औरंगाबादमधल्या या सभेनंतर मराठवाड्यातली शिवसेनेने घट्ट पाय रोवले.

औरंगाबाद नगरपालिका निवडणुका जिंकल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी एक विजयी सभा घेतली, ज्यामध्ये त्यांनी औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून संभाजीनगर करण्याचं आवाहन केलं होतं.

आता ३४ वर्षांनंतर राज ठाकरेही याच मैदानात हिंदुत्वाचाच धागा पकडून भव्य सभा घेणार आहेत.

go to top