वीरपत्नीला कडक सॅल्यूट! शहीद जवानाच्या पत्नीनं पाठवल्या मराठा बटालियनला 'राख्या' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहीद जवानाच्या पत्नीनं पाठवल्या मराठा बटालियनला 'राख्या'

Maratha Battalion

जावली तालुक्यातील उंबरी गावच्या शहीद अशोक धनाजी जाधव यांच्या पत्नी सुवर्णा अशोक जाधव या दरवर्षी जवानांना राख्या पाठवत असतात.

कास (सातारा) : रविवारी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होईल, पण आपल्या घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या फौजी बांधवांच्या 'नशिबी' हा योग प्रत्यक्षात कुटुंबात साजरा करण्याचा 'योग' कधीतरी येतो.

देशभरातून जवानांना राख्या पाठवल्या जातात. याचप्रमाणे जावली तालुक्यातील उंबरी गावच्या शहीद अशोक धनाजी जाधव यांच्या पत्नी सुवर्णा अशोक जाधव या दरवर्षी जवानांना राख्या पाठवत असतात.

यावर्षी मराठा बटालियनला पाठवलेल्या राख्या तेथील जवानांनी एकामेकांना बांधून आजच रक्षाबंधन साजरी केली आणि याचे फोटो सुवर्णा यांना पाठवून कृतज्ञताही व्यक्त केली.

सुवर्णा यांचे पती अशोक जाधव हे मिल्ट्री इंजिनिअर सर्व्हिसमध्ये होते. तीन वर्षांपूर्वी ड्युटीवर असतानाच ते शहीद झाले.

जवानांच्या प्रती असलेल्या निष्ठेखातर सुवर्णा दरवर्षी न चुकता राख्या पाठवत असतात. या वर्षी मराठा बटालियनमध्ये असलेले गांजे (ता. जावली) येथील जवान महेश चिकणे नुकतेच आपली सुट्टी संपवून जाणार होते. महेश चिकणे यांच्या मार्फत सुवर्णा यांनी राख्या पाठवत ही परंपरा कायम ठेवली.

या जवानांनी जम्मूमध्ये आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी राख्या बांधून ही अनोखी रक्षाबंधन साजरी केली. त्याचे फोटो सुवर्णा यांना पाठवून ह्या बहीण-भावाच्या नात्याच्या अतुट बंधनांची वीण घट्ट केलीय.

फिल्ड एरियाच्या सैनिकांपर्यंत राखी बांधायला कोणीच जात नाही आणि पोस्टानेही पोहोचत नाही. म्हणून, जसं जमेल तसं त्यांच्यापर्यंत कशा राख्या पोहोचतील याचाच प्रयत्न असतो, असं वीरपत्नी सुवर्णा अशोक जाधव यांनी सांगितलं.

go to top