PHOTOS | रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर बनले विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS | रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर बनले विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष

Rahul Narvekar And Ramraje Nimbalkar

मुंबई : आज महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केला. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. विरोधी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. संख्याबळाचा विचार केल्यास राहुल नार्वेकर हे निवडून येतील याची दाट शक्यता होती. आतापर्यंत विधानसभेचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरतील.

राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१६ मध्ये त्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषद सदस्य म्हणून संधी दिली गेली होती.

राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१६ मध्ये त्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषद सदस्य म्हणून संधी दिली गेली होती.

या अगोदर नार्वेकर हे शिवसेनेत होते. वर्ष २०१४ मध्ये शिवसेनेने त्यांना लोकसभेचे तिकिट न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

या अगोदर नार्वेकर हे शिवसेनेत होते. वर्ष २०१४ मध्ये शिवसेनेने त्यांना लोकसभेचे तिकिट न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मावळ मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक हरल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

मावळ मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक हरल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

या पक्षाच्या तिकिटावर ते कुलाबा मतदारसंघातून विजयी झाले.

या पक्षाच्या तिकिटावर ते कुलाबा मतदारसंघातून विजयी झाले.

माजी नगरसेवक तथा शिवसैनिक सुरेश नार्वेकर यांचे ते पुत्र आहेत. विद्यमान विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे राहुल नार्वेकर हे जावई आहेत.

माजी नगरसेवक तथा शिवसैनिक सुरेश नार्वेकर यांचे ते पुत्र आहेत. विद्यमान विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे राहुल नार्वेकर हे जावई आहेत.

go to top