Randeep Hooda : रणदीप हुड्डाने गाड्या पुसण्यापासून ते हाॅटेलमध्ये केलयं काम

प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाने मेहनतीने मिळवलयं यश
Randeep Hooda
Randeep Hooda esakal

Randeep Hooda Birthday : हरियानाचे अनेक जण बाॅलीवूडमध्ये अभिनेता आहेत. यात जयदीप अहलावत, सतीश कौशिक, राजकुमार राव, यशपाल शर्मा आदींचा समावेश होतो. मात्र या सर्वांमध्ये एक नाव अस आहे ज्याची स्वतःची मोठी फॅन फाॅलोइंग आहे. चित्रपटांमध्ये त्याने अनेकदा हरियाणवीची भूमिका केली आहे. ते नाव आहे रणदीप हुड्डा (Randeep Hooda). ३२ चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या रणदीप बाॅलीवूडमध्ये दोन दशके काम करित आहे. त्याने चित्रपट विश्वात २० वर्षांपेक्षा जास्त वेळ व्यतीत केला आहे. त्याचा पहिला चित्रपट मान्सून वेडिंग २००१ मध्ये आला होता. या चित्रपटात त्याने एनआरआयची भूमिका केली होती. बाॅलीवूडमध्ये आपले स्थान बनवलेल्या रणदीपचा प्रवास खूपच रोचक आहे. आज २० ऑगस्ट रोजी रणदीप आपला ४५ वा वाढदिवस साजरा करित आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त जाणून घ्या त्याच्याशी संबंधित काही किस्से जे तुम्हाला माहीत नसतील...चित्रपटाने बदलले नशीब : वर्ष २००५ मध्ये अंडरवर्ल्डवरील डी चित्रपटावर चर्चेला उधाण आले. तेथून रणदीपला ओळख मिळाली. हा चित्रपट रणदीपच्या करिअरसाठी टर्निंग पाॅईंट ठरला होता. दाऊदवर आधारित या चित्रपटाने रणदीपला स्टार बनवले. त्यानंतर रणदीपने कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्याने ३२ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो सलमान खान सारख्या सुपरस्टार्सबरोबर स्क्रीन शेअर करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com