Nashik News : महागाई विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर, चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन; पहा Photos
कांदा, भाजीपालासह इतर शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी करत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे.
शेतकरी व महिला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या
यावेळी सिलेंडर व लाकडाची मोळी, चूल मांडत शासनाच्या धोरणांचा घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी कांदा रस्त्यावर ओतत शासनाच्या धोरणांचा घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार, आमदार दिलीपकाका बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार संजय चव्हाण, राज्य महिला आयोग सदस्या दिपीका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.