रत्नागिरी : प्रसिद्ध पर्यटन स्थळे

रत्‍नागिरी जिल्ह्याला १६७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र, रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात.
आंजर्ले समुद्रकिनारा
आंजर्ले समुद्रकिनाराsakal
Updated on
थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे.
थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या(आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. sakal
रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्‍नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्‍नदुर्ग रत्‍नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्‍नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे.
रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्‍नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्‍नदुर्ग रत्‍नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोडाच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्‍नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. sakal
रत्नागिरी शहरात डॉ. बाबासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या अधिपत्याखालील मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे. येथे खाऱ्या व गोड्या पाण्यातील विविध प्रकारचे मासे व इतर जलचर यांचे संग्रहालय आहे.
घोडमासा, कोंबडामासा, ट्रिगरमासा, समुद्री काकडी, शेवंड, तारामासा, ऑक्टोपस, समुद्री कासवे, समुद्री साप अशा अनेक नमुन्यांबरोबरच सुमारे १३०० समुद्री जिवांचे नमुने असलेले हे मत्स्यालय पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचेही आकर्षण ठरले आहे. त्या शिवाय शिंपल्यांचे २५० हून जास्त प्रकार इथे ठेवले आहेत.
रत्नागिरी शहरात डॉ. बाबासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या अधिपत्याखालील मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नदुर्ग किल्ल्याजवळ आहे. येथे खाऱ्या व गोड्या पाण्यातील विविध प्रकारचे मासे व इतर जलचर यांचे संग्रहालय आहे. घोडमासा, कोंबडामासा, ट्रिगरमासा, समुद्री काकडी, शेवंड, तारामासा, ऑक्टोपस, समुद्री कासवे, समुद्री साप अशा अनेक नमुन्यांबरोबरच सुमारे १३०० समुद्री जिवांचे नमुने असलेले हे मत्स्यालय पर्यटकांबरोबरच अभ्यासकांचेही आकर्षण ठरले आहे. त्या शिवाय शिंपल्यांचे २५० हून जास्त प्रकार इथे ठेवले आहेत. sakal
भारतीय असंतोषाचे जनक अशी बिरुदावली धारण करणारे स्वातंत्र्यसंग्रामाचे अध्वर्यू लोकमान्य टिळक यांचा दीडशे वर्षांपूर्वी १८५६ मधे रत्नागिरीत जन्म झाला. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक आळीत हे टुमदार कोकणी घर असून जन्मानंतर लो. टिळकांचे या घरांत सुमारे १० वर्षे वास्तव्य होते.आहे.
भारतीय असंतोषाचे जनक अशी बिरुदावली धारण करणारे स्वातंत्र्यसंग्रामाचे अध्वर्यू लोकमान्य टिळक यांचा दीडशे वर्षांपूर्वी १८५६ मधे रत्नागिरीत जन्म झाला. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक आळीत हे टुमदार कोकणी घर असून जन्मानंतर लो. टिळकांचे या घरांत सुमारे १० वर्षे वास्तव्य होते.आहे.sakal
जय विनायक मंदिर.  हे रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन बांधलेले मंदिर आहे. मंदिर स्वच्छ आणि सुंदर सजवलेल्या बागेसाठी आणि पर्यटकांसाठी ताजी हवा आणि थंड वातावरणासाठी ओळखले जाते.
जय विनायक मंदिर. हे रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन बांधलेले मंदिर आहे. मंदिर स्वच्छ आणि सुंदर सजवलेल्या बागेसाठी आणि पर्यटकांसाठी ताजी हवा आणि थंड वातावरणासाठी ओळखले जाते. sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com