sakal

बोलून बातमी शोधा

रवी शास्त्रींना 'या' ललनेचा जोरदार 'बॅक हँड' काही झेपला नाही

Ravi Shastri Tennis Star Gabriela Sabatini

अर्जेंटिनाची टेनिस स्टार गॅब्रिएला सबातीनीने (Gabriela Sabatini) 80 च्या दशकात टेनिस कोर्ट गाजवले होते. आज ती आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या काळातील महिला टेनिसपटूंपैकी सर्वात सुंदर टेनिसपटू (Beautiful Tennis Player) म्हणून देखील तिची ख्याती होती. तिच्या मागे जगभरातील अनेक पुरूष मजनू झाले होते. असाच एक मजनू भारतात देखील होता. हा मजनू म्हणजे 1983 च्या वर्ल्डकप विनिंग टीममधील अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री. गॅब्रिएला सबातीनीच्या सौंदऱ्याने घायाळ झालेले रवी शास्त्री आणि त्यांचा पिक्चर पाडणऱ्या गॅब्रिएलाचा एक किस्सा त्याकाळी खूप चर्चेत आला होता.

1983 मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला होता. रवी शास्त्री हे या वर्ल्डकप विजेत्या संघात होते. आता जरी शास्त्रींचे पोट सुटले असले तरी त्या काळी रवी शास्त्रींच्या व्यक्तीमत्व हे एखाद्या हिरोला लाजवले असे होते. असे हिरो मटेरियल रवी शास्त्री हे गॅब्रिएला सबातीनीवर फिदा होते. त्यांनी सबातीनीला डेट करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

रवी शास्त्री एकदा सबातीनीला प्रपोज करण्यासाठी अर्जेंटिनाला देखील गेले होते. त्या काळात सबातीनी ही टेनिस जगतावर खेळाने आणि तिच्या सौंदर्याने देखील अधिराज्य गाजवत होती. रवी शास्त्री देखील भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू होते.

ज्यावेळी गॅब्रिएलाला रवी शास्त्रींबद्दल विचारणा झाली त्यावेळी त्यांनी कोण रवी शास्त्री असे म्हणत रवी शास्त्रींच्या प्रपोजवर जोरदार बॅकहँड मारला होता. त्याकाळी हा किस्सा माध्यमांमध्ये खूप चर्चेत राहिला होता. त्यावेळी रवी शास्त्रींनी सारवासारव करत मी वैयक्तिक कामासाठी अर्जेंटिनाला गेलो होतो असे सांगितले.

 सबातीनीने 1990 मध्ये युएस ओपन, 1988 आणि 1994 मध्ये डब्ल्यूटीए फायनल जिंकली होती. तर ती 1991 मध्ये विंम्बल्डन आणि 1988 मध्ये युएस ओपनची उपविजेती देखील राहिली होती. 1988 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्य पदक देखील जिंकले होते.