sakal

बोलून बातमी शोधा

तुम्हाला माहिती आहे? 'या' छोट्या-छोट्या कारणामुळं सुध्दा मोडू शकतात लग्न!

Marriage
नातं कोणतही असो, त्याचा पाया विश्वासावर अवलंबून असतो. जिथं 'विश्वास' तुटलेला असतो, तिथं संबंध तुटण्यास फार वेळ लागत नाही. आता नवरा-बायकोचं नातं घ्या.. असं म्हटलं जातं, की हे नातं सात फेऱ्या आणि सात बंधांशी बांधलं गेलं आहे, परंतु जन्मोजन्मीचं टिकणारं हे नातं छोट्या-छोट्या गोष्टींमुळं आजच्या युगातही तुटलं जातं. असं देखील पाहिलंय, की लोकांकडे पूर्वीसारखं संबंध टिकवण्याची सहनशीलता उरली नाही. खरं तर, मुलं आणि मुली लग्नाचं सुंदर स्वप्न पाहतात. मात्र, लग्नानंतर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालेला पहायला मिळतो, त्यामुळे ते निराश होऊन जातात. जरी लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस चांगले निघून जात असले, तरी नंतर बऱ्याच जोडप्यांमध्ये समस्या वाढतात आणि त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नाती तुटलेली पहायला मिळतात.

गैरसमज : गैरसमजांमुळे बऱ्याच वेळा पती-पत्नीचे संबंध तुटलेले पहायला मिळतात. एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराबद्दल कितपत विश्वास ठेवते, त्यावर त्यांचं नातं अवलंबून असतं. आपला जोडीदार कोणासोबत फोनवर बोलतो, कोणाशी चॅटिंग करतो, तो का मला इग्नोर करत आहे?, अशा बऱ्याच गैरसमजांमुळे पती-पत्नीच्या नात्यांत मोठी फुट पडलेली पहायला मिळते आणि ते नातं काही दिवसानंतर घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचतं. त्यामुळे कोणतही नातं टिकवायचं असेल, तर नात्यातील गैरसमज नक्की टाळा.

आर्थिक अडचणी : बर्‍याच वेळा लोकांकडे नोकरी किंवा पैसे मिळण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नसते. मात्र, लग्नानंतर कदाचित त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक होईल, असा विचार करून ते लग्नाच्या पवित्र बंधनात अडकतात. पण, लग्नानंतर बर्‍याच वेळा नोकरीसुद्धा मिळत नाही आणि आर्थिक परिस्थिती बिघडत जाते. अशा स्थितीत पती-पत्नीमध्ये बर्‍याच वेळा समस्या उद्भवू शकतात.

स्वप्नांच्या पलीकडचं जीवन : मुलगा असो, की मुलगी.. प्रत्येकजण लग्न आणि त्यानंतरचं आयुष्य कसं सुंदर जगता येईल याची स्वप्न पाहत असतात. त्यांच्या आयुष्यात काय घडेल, ते आपल्या जोडीदाराला कसे आनंदी ठेवतील, जोडीदाराकडून त्यांच्या काय अपेक्षा असतील इत्यादी. पण, लग्नानंतर त्यांच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झालेला पहायला मिळतो आणि त्याचा थेट संबंध नात्यावर होतो.

आपल्या जोडीदाराशी भावनिकरित्या कनेक्ट रहा : नात्यांमध्ये संबंध टिकवायचा असेल, तर त्यास भावनिकरित्या देखील जोडलं गेलं पाहिजे. पण, बर्‍याच वेळा पती-पत्नीच्या नात्यात असेही दिसून येते, की दोघेही एकमेकांशी भावनिकरित्या कनेक्ट होऊ शकत नाहीत. जरी ते घरातील सदस्यांच्या इच्छेनुसार, एरेंज्ड मॅरेज करतात. परंतु, त्यांच्यात आपापसामध्ये काहीच पटत नाही आणि यामुळे नाती बर्‍याच वेळा तुटतात.