Swasthyam 2022: रुहानी सिस्टर्सने  संगीतातून उलगडला परमेश्‍वराशी बंध
Sakal

Swasthyam 2022: रुहानी सिस्टर्सने संगीतातून उलगडला परमेश्‍वराशी बंध

‘सकाळ’तर्फे आयोजित स्वास्थ्यम्’ उपक्रमामध्ये ‘रुहानी सिस्टर्स’ सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी कव्वालीच्या माध्यमातून हीर-रांझाच्या प्रेमाची कथा मांडली.
Published on

सूफी संगीत, गझल आणि कव्वालीने आपली अनोखी ओळख निर्माण करणाऱ्या ‘रुहानी सिस्टर्स’ या खऱ्या आयुष्यात सख्या बहिणी नाहीत. परंतु संगीतासाठी असलेले प्रेम, भक्ती आणि आवड यामुळे डॉ. जागृती लुथरा प्रसन्न व डॉ. नीता पाण्डेय नेगी या दोघी एकत्र आल्या. रुहानी अर्थात ‘आत्म्याला भावणारे, त्यात सूफी संगीताच्या प्रेमामुळे त्या एकमेकांच्या आत्म्याशी जोडल्या गेल्या. त्यामुळेच या दोघी ‘रुहानी सिस्टर्स’ म्हणून प्रसिद्ध झाल्या.

उस्ताद नुसरत फतेह अली खानचा सूफी संगीतातील योगदान आणि महिलांचे सूफी संगीतातील योगदान, असे त्यांच्या पीएचडीचे विषय होते. त्यामुळे या दोघींना ‘द फिमेल व्हॉइस ऑफ सूफीझम’ असे ही म्हणले जाते.
उस्ताद नुसरत फतेह अली खानचा सूफी संगीतातील योगदान आणि महिलांचे सूफी संगीतातील योगदान, असे त्यांच्या पीएचडीचे विषय होते. त्यामुळे या दोघींना ‘द फिमेल व्हॉइस ऑफ सूफीझम’ असे ही म्हणले जाते.Sakal
सूफियाना संगीतातून परमेश्‍वराला आपल्या प्रेमाच्या नात्याला घट्ट करण्यासाठी प्रार्थना करणारी हीर आपल्या रांझाची वाट पाहण्यापासून ते रांझा आला नाही तर, ती काय करेल? अशा एक न अनेक प्रकारच्या मनात उद्भवणाऱ्या भावनांना व्यक्‍त करणारी कव्वाली सादर केली. कव्वालीच्या माध्यमातून रुहानी सिस्टर्सने हीर-रांझाच्या प्रेमाची कथा मांडली.
सूफियाना संगीतातून परमेश्‍वराला आपल्या प्रेमाच्या नात्याला घट्ट करण्यासाठी प्रार्थना करणारी हीर आपल्या रांझाची वाट पाहण्यापासून ते रांझा आला नाही तर, ती काय करेल? अशा एक न अनेक प्रकारच्या मनात उद्भवणाऱ्या भावनांना व्यक्‍त करणारी कव्वाली सादर केली. कव्वालीच्या माध्यमातून रुहानी सिस्टर्सने हीर-रांझाच्या प्रेमाची कथा मांडली. sakal
परमेश्‍वरा आपल्या भोवती असल्याचा भास आपल्याला प्रत्येक क्षणी होतो. तो आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आवज देतो, पण नकळतपणे आपण त्याला दुर्लक्ष करतो. तेव्हा परमेश्‍वर केवळ एकच उत्तर देतो, ते म्हणजेच मला शोधायचे असेल तर स्वतःमध्ये शोधा. ‘मी तुमचातच आहे’, ‘तुमाचातील अंश आहे’ याची जाणीव आपल्या अंतर्मनात करून देतो. ती नेमकी कशी याचीच अनुभूती रुहानी सिस्टर्सने आपल्या सूफी संगीतातून घडवून दिली.
परमेश्‍वरा आपल्या भोवती असल्याचा भास आपल्याला प्रत्येक क्षणी होतो. तो आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आवज देतो, पण नकळतपणे आपण त्याला दुर्लक्ष करतो. तेव्हा परमेश्‍वर केवळ एकच उत्तर देतो, ते म्हणजेच मला शोधायचे असेल तर स्वतःमध्ये शोधा. ‘मी तुमचातच आहे’, ‘तुमाचातील अंश आहे’ याची जाणीव आपल्या अंतर्मनात करून देतो. ती नेमकी कशी याचीच अनुभूती रुहानी सिस्टर्सने आपल्या सूफी संगीतातून घडवून दिली.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com