Rose Day 2023: एकेकाळचं मुघल गार्डन आणि आत्ताचं अमृत उद्यान; का आहे गुलाबाकरीता प्रसिद्ध?
अमृत उद्यान हे वैविध्यपूर्ण गुलाबांसाठी ओळखला जातो. ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं.15 एकरांवर पसरलेल्या या बागेत ट्यूलिप, गुलाबासह विविध प्रजातींची फुले आहेत.
15 एकरांवर पसरलेल्या या बागेत ट्यूलिप, गुलाबासह विविध प्रजातींची फुले आहेत.
अमृत उद्यान गुलाबांनी बहरते तेव्हा निसर्गानं रांगोळी काढल्याचाच भास होतो. गुलाब ही या उद्यानाची खासियतत आहे.
इथे जगभरतली कित्येत सुंदर, सुवासिक आणि प्रसिद्ध पुष्पं आहेत.
राष्ट्रपती भवनातली माळीकाम करणारी टीम हे उद्यान कायम ताजंतवानं ठेवायचं काम करते.
इथे गुलाबाच्या 159 प्रजाती आहेत ज्याचं एडोरा, मृणालिनी, ताज महल, आयफल टॉवर, मॉडर्न आर्ट, ब्लॅक लेडी, पॅराडाइज, ब्लू मून आणि लेडी एक्सचा समावेश आहे.या बागेत मदर टेरेसा, राजा राममोहन राय, जॉन एफ, केनेडी, महाराणी एलिझाबेथ, क्रिश्चियन डायोर अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचे गुलाबही आहेत.
मुघल शैलीत तयार केलेल्या उद्यानाचं नाव आता अमृत उद्यान असं करण्यात आलंय.
राष्ट्रपती भवनातील हे उद्यान यापूर्वी मुघल गार्डन नावाने संबोधलं जायचं. फुलांचा हा उत्सव पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. जिथे नजर फिरवावी तिथे फुलांच्या माध्यमातून नैसर्गिक रंगांची उधळणच केलेली पाहायला मिळते.
फुलांभोवती फुलपाखरांचं उडणं अधिकच मोहक वाटतं. या गार्डनमध्ये फुलपाखरंही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला 'तितली गार्डन' असंही म्हटलं जातं.
ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं.