सांगलीत उमेदवारांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण

या विजयाने काँग्रेसने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
सांगलीत उमेदवारांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा 
जल्लोष, गुलालाची उधळण
Updated on
Summary

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग '१६ अ'च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे तोफिक शिकलगार विजयी झाले. शिकलगार यांनी भाजपचे अमोल गवळी यांचा ३९९५ मतांनी पराभव केला. या विजयाने काँग्रेसने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. महापालिकेच्या सांगली शहरातील 'प्रभाग 16 अ' च्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. या रणधुमाळीचे छायाचित्र टिपलेत 'सकाळ'चे उल्हास देवळेकर यांनी....

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग '१६ अ'च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे तोफिक शिकलगार विजयी झाले.
सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग '१६ अ'च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे तोफिक शिकलगार विजयी झाले.
शिकलगार यांनी भाजपचे अमोल गवळी यांचा ३९९५ मतांनी पराभव केला. या विजयाने काँग्रेसने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
शिकलगार यांनी भाजपचे अमोल गवळी यांचा ३९९५ मतांनी पराभव केला. या विजयाने काँग्रेसने ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कॉंग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी हा प्रभाग पिंजून काढला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार यांनी या प्रभागात ताकद लावली होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार यांनी या प्रभागात ताकद लावली होती.
या प्रभागात एकूण १२१९१ मतदान झाले होते. आज महापालिकेच्या स्टेशन चौकातील जुना घरपट्टी कार्यालयात मतमोजणी झाली. चार फेऱ्या मध्येच मतमोजणी पूर्ण झाली.
या प्रभागात एकूण १२१९१ मतदान झाले होते. आज महापालिकेच्या स्टेशन चौकातील जुना घरपट्टी कार्यालयात मतमोजणी झाली. चार फेऱ्या मध्येच मतमोजणी पूर्ण झाली.
काँग्रेसचे तौफिक शिकलगार त्यांनी पहिल्या फेरी पासूनच आघाडी घेतली. चारही फेऱ्यात त्यांची आघाडी कायम राहिली.
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश सावंत यांना 587 तर शिवसेनेचे महिंद्र खंडाळे यांना 535 मते मिळाली.
काँग्रेसचे तौफिक शिकलगार त्यांनी पहिल्या फेरी पासूनच आघाडी घेतली. चारही फेऱ्यात त्यांची आघाडी कायम राहिली. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश सावंत यांना 587 तर शिवसेनेचे महिंद्र खंडाळे यांना 535 मते मिळाली.
कडेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने सत्ताधारी काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसला केवळ 5 जागावर समाधान मानावे लागले आहे.
कडेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने सत्ताधारी काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे. काँग्रेसला केवळ 5 जागावर समाधान मानावे लागले आहे.
शहरात नवख्या असलेल्या राष्ट्रवादीनेही निवडणुकीत 1 जागा जिंकत धक्का दिला आहे. नगरपंचायतीत सत्तांतर झाल्याने कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना हा धक्का मानला जात आहे.
शहरात नवख्या असलेल्या राष्ट्रवादीनेही निवडणुकीत 1 जागा जिंकत धक्का दिला आहे. नगरपंचायतीत सत्तांतर झाल्याने कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना हा धक्का मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com