Photo l सांगलीच्या सुशांतची कमाल;वडिलांसाठी बनवली इलेक्ट्रिक सायकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo l सांगलीच्या सुशांतची कमाल;वडिलांसाठी बनवली इलेक्ट्रिक सायकल

sangli

सांगली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यावर उपाय म्हणून सांगलीतील Sangli) एका १४ वर्षाच्या मुलाने चक्क इलेक्ट्रिक सायकल (Electric Bicycle) तयार केली आहे. विशेष म्हणजे ही सायकल त्याने वडिलांसाठी तयार केली आहे. सांगली जिल्ह्यातील वांगी (Wangi) गावच्या सुशांत मेटकरी या मुलाने ही सायकल तयार केली आहे. हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

वाढते पेट्रोलचे दर पाहून आपल्या वडिलांना कामावर सायकल वरून सहजरित्या जाता यावे. यासाठी सुशांतने  इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. ही सायकल २ तास चार्ज केली की ५० किमी पर्यत धावते.

आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना अन् दुर्दैवाने त्याला या वयात हाय-शुगरचा त्रास असताना देखील केवळ वडिलांसाठी इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे.

या सायकलसाठी १२ व्होल्टच्या २ बॅटरी जोडल्या आहेत. आता ही सायकल २ तास चार्ज केली की ५०  किमी पर्यत विना पॅडेल मारता धावते.

पेट्रोल वाढले म्हणून दुचाकी वापरणे बंद केलेल्या दत्तात्रय यांना आपल्या पोराच्या हुशारीच्या जोरावर दोन चाकी आणि पॅडेल न मारता फक्त रेस वाढवली की पळणारी इलेक्ट्रिक सायकल मिळालीय. सुशांतच्या या हुशारीवर त्याचे आई-वडील, मामा प्रचंड खुश आहेत आणि पंचक्रोशीत देखील सुशातचे कौतुक होत आहे.