sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा; देशभरातील 7500 स्पर्धकांचा सहभाग

Satara Hill Half Marathon

या स्पर्धेत देशभरातील तब्बल 7500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. देश विदेशातून अनेक स्पर्धक या मॅरेथाॅनमध्ये सहभागी होतात.

सातारा : यंदाच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनला (Satara Hill Half Marathon) आज सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची स्पर्धा अवघड अशा यवतेश्वर घाटमाथ्यावर (Yavteshwar Ghat) पार पडते.

या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी झेंडा दाखवून केलं.

या स्पर्धेचा प्रारंभ पोलीस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर ही स्पर्धा पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून, हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हिल रिसॉर्ट व नित्यमुक्त साई रिझॉर्ट पर्यंत जाऊन पुन्हा त्याच मार्गानं पोलीस परेड ग्राउंड इथं समाप्त होईल.

ही स्पर्धा नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सातारा रनर्स फाऊंडेशनच्या वतीनं स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी, औषधं, बिस्कीटं, वेदनाशामक स्प्रे, कुलिंग स्टेशन इत्यादीची व्यवस्था करण्यात आली होती.

तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फूड पॅकेट्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय स्पर्धेच्या मार्गावर जर एखाद्या स्पर्धकाला जर काही त्रास झालाच तर त्या स्पर्धकाला त्वरित प्रथमोपचार कसा करता येईल इत्यादी आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना देण्यात आलं आहे.

सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील एका स्पर्धकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. राज पटेल असं या स्पर्धकाचं नाव आहे. हा स्पर्धक कोल्हापूरमधील राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. (फोटो : प्रमोद इंगळे)

टॅग्स :SataraMarathon