Photo: पाहा 'सायली संजीव'च्या काही खास साड्या आणि स्टाईलिश ब्लाउज..
एका साध्या व्हिडीओ अल्बममधनं अभिनयक्षेत्रातला आपला प्रवास सुरू केलेल्या सायलीनं (sayali snajeev) आपल्या अभिनयाच्या जोरावर हळूहळू नाटक,मालिका ते थेट ७० एम.एमच्या सिल्व्हर स्क्रीन पर्यंत मजल मारली. 'काहे दिया परदेस'सारखी मालिका ते आताच्या सुपरहीट 'झिम्मा' सिनेमातील सायली संजीवचा प्रवास म्हणजे 'साधी-सरळ मुलगी' ते 'बोल्ड गर्ल' असाच म्हणावा लागेल. याच सायलीचा हा पारंपरिक पण काहीसा स्टायलिश लुक..
सायलीला साड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे दर काही दिवसांनी वेगवगेळ्या पद्धतीच्या साड्या नेसून ती फोटोशूट करत असते.
पैठणी हा इतर महिलांप्रमाणे सायलीच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे विविध समारंभात सायलीने पैठणी नेसलेली दिसते.
सायली हातमागावरील पारंपरिक साडीला विशेष प्राधान्य देते. सुती कपड्यातील 'इकत' हा कापडाचा प्रकार तिला विशेष आवडतो.
सायली वेस्टर्न कपड्यांइतकीच पारंपरिक पोषाखातही खुलून दिसते. त्यामुळे राज्यातील बऱ्याच वस्त्रालयांसाठी तिचे खास फोटशूट करण्यात आले आहे.
या फोटोत सायलीने पूर्णतः हातमागावर विणलेली पैठणी नेसली आहे. गुलाबी रंगाच्या या पैठणीचा पदर हा विशेष पाहण्यासारखा आहे. पदरावरील मोर आपले लक्ष वेधून घेतो.