बीडमधून निघालाय मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, पाहा PHOTO मधून

बीड : मोर्चेकऱ्यांच्या हाती असलेल्या ध्वजांमुळे असे भगवेमय वातावरण झाले.
बीड : मोर्चेकऱ्यांच्या हाती असलेल्या ध्वजांमुळे असे भगवेमय वातावरण झाले.
Summary

बीड : मराठा समाजाचे आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी शहरातून ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा : लढा आरक्षणाचा’ मोर्चा निघाला आहे. मोर्चेकरी मागण्यांचे फलक आणि भगवे झेंडे हाती घेऊन सहभागी झाले आहेत. ‘जय जिजाऊ जय शिवराय’,‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’,‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही’,अशा घोषणांनी परिसर दणानून गेला आहे. मोर्चामध्ये महिलाही सहभागी झाल्या आहेत. आरक्षण रद्द झाल्यानंतरचा राज्यातला हा पहिलाच मोर्चा आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पुढाकार घेतलेल्या मोर्चात माजी आमदार नरेंद्र पाटील यांनीही सहभाग घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com