sakal

बोलून बातमी शोधा

किरीट सोमय्यांच्या पुतळ्याची शिवसेनेने काढली अंत्ययात्रा; पाहा Photos

Shiv Sena's agitation

जुने नाशिक : शिवसेना ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर सक्तवसुली संचालनालयातर्फे होत असलेल्या कारवाईमुळे शिवसेनेतर्फे (Shivsena) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या निषेधार्थ पुतळ्याची प्रतिकात्मक शालिमार परिसरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. केंद्र सरकार आणि सोमय्या यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय बाहेर घोषणाबाजी करून शालिमार चौकातून सोमय्या यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

त्यानंतर कार्यालयासमोर पुतळ्याचे अंतिम संस्कार करण्यात आले.

विविध प्रकारच्या घोषणा देऊन केंद्र सरकार आणि किरीट सोमय्या यांचा शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.

या आंदोलनामुळे काही वेळ या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या वेळी शिवसेना उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, योगेश घोलप, सचिन मराठे, महेश बडवे, महिला आघाडीच्या शोभा मगर, मंगला भास्कर, ज्योती देवरे, एकता खैरे, मंदा दातीर, बंटी तिदमे, बाळासाहेब कोकणे, सचिन बांडे, गणेश बर्वे, निशांत अवसरकर, किरण पाटील, गोविंद कांकरिया, सुनील जाधव, राहुल दराडे, वैभव ठाकरे, योगेश बेलदार, शंभु बागूल, पप्पू टिळे, देवानंद बिरारी, योगेश देशमुख, नितीन चिडे, दिगंबर मोगरे, सचिन राणे, देवा जाधव, राजाभाऊ क्षीरसागर, संजय चव्हाण, फैमिदा रंगरेज, जयश्री खर्जुल आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.