Shivsena Row : चिन्ह अन् नावासाठी २००० कोटींचा सौदा; संजय राऊतांनी रेटकार्डच दाखवलं!
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे.
अशातच आता खासदार संजय राऊत यांनी हे चिन्ह आणि नावासाठी २००० कोटींचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
तसंच बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील, देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं, असंही संजय राऊत म्हणाले होते.
माध्यमांशी बोलताना तर राऊतांनी आमदार खासदारांचं रेटकार्डच काढलं आहे.
नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये दर ठरला असून आमदार 50 कोटी आणि खासदार यांच्यासाठी 100 कोटी रूपये देत असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.
त्यांच्या मिञ परिवारातील बिल्डरांनी ही रक्कम दिल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
यावरुन ही राऊतांची बेताल बडबड असल्याची टीका भाजपाने केली आहे.
तर या २००० कोटीच्या सौद्याचे पुरावे कोर्टात याचिका दाखल करताना सादर करणार ना? असा खोचक सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना केला आहे.