नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरास

नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरास
नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरास
नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरासSakal

पंढरपूर (सोलापूर) : इंग्रजी नवीन वर्षारंभाच्या 2022 (New Year 2022) निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात विविध रंगांची तब्बल 1500 किलो फुले आणि 700 किलो फळे वापरून मनमोहक आरास करण्यात आली आहे. फुलांची आरास करण्यासाठी प्रदीप प्रकाश ठाकूर पाटील (आळंदी, पुणे) यांनी फुले उपलब्ध करून दिली. (Shri Vitthal-Rukmini temple in Pandharpur decorated with various flowers and fruits)

विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव, एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. अनेक भाविक त्यासाठी आधी मंदिर समितीशी संपर्क साधून आवश्‍यक ती फुले आणि फळे उपलब्ध करून देत असतात.
विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव, एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. अनेक भाविक त्यासाठी आधी मंदिर समितीशी संपर्क साधून आवश्‍यक ती फुले आणि फळे उपलब्ध करून देत असतात.Sakal
इंग्रजी नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचा गाभारा आणि मंदिरातील अन्य भागात फळाफुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
इंग्रजी नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचा गाभारा आणि मंदिरातील अन्य भागात फळाफुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.Sakal
यासाठी गुलाब, जरबेरा, ब्लू डीजे, कामिनी, शेवंती, ऑर्केड, मिनीपाम, सॅंगोप, ड्रेसीना सायकस या वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
यासाठी गुलाब, जरबेरा, ब्लू डीजे, कामिनी, शेवंती, ऑर्केड, मिनीपाम, सॅंगोप, ड्रेसीना सायकस या वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. Sakal
याशिवाय केळी, अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब अशा विविध फळांची आणि पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे.
याशिवाय केळी, अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब अशा विविध फळांची आणि पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे.Sakal
शिंदे ब्रदर्स, साई डेकोरेटर्स, पंढरपूर यांनी आरास डेकोरेशनचे काम केले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
शिंदे ब्रदर्स, साई डेकोरेटर्स, पंढरपूर यांनी आरास डेकोरेशनचे काम केले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.Sakal
श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात करण्यात आलेली ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्ताने परगावाहून देखील मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दर्शनासाठी आले असल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे.
श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात करण्यात आलेली ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्ताने परगावाहून देखील मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दर्शनासाठी आले असल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com