- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
पाच महिन्यानंतर आझाद मैदानात निरव शांतता; आंदोलनाच्या खाणाखुणा कायम

मुंबईतील आझाद मैदान हे राज्यभरातील आंदोलकांसाठी एक हक्काचे ठिकाण आहे. अधिवेशन काळातच मैदान आंदोलन, मोर्च, उपोषणाने गजबजले असते. या मैदानाने असंख्य आंदोलने पाहीली. मात्र एसटी संपकऱ्यांनी हे मैदान तब्बल पाच महिने व्यापलं होत. अलिकडच्या काळातील सर्वाधिक काळ चाललेलं हे आंदोलन ठरलं.

शुक्रवारी सिल्वर ओक इथे झालेल्या हल्यात सहभागी असलेले कामगार आझाद मैदानातून गेले होते. त्यावरुन पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले. या घटनेतंर आझाद मैदानावर झालेले पोलिस ड्रील, वाढवलेला सुरक्षा बंदोबस्त बघता मैदान रिकामे होणार याचा अंदाज आला होता.

मैदान रिकामे केल्यानंतर पोलिसांनी दरवाजे बंद केले, सुरक्षा बंदोबस्त वाढवला. सकाळी 11 वाजताच्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी उभारलेला पेंन्डाल सोडण्याचे काम सुरू होते. आझाद मैदानाच्या संपूर्ण परिसरात एसटी कर्मचाऱ्यांचे साहित्य अस्तवस्त पडल्याचे दिसून आले. अनेकांनी जातेवेळी आपले कपडे नेले नसल्याचे दिसून आले.

पोलिसांनी काहीशी बळजबरी, आयडीला लढवून शनिवारी पहाटेपासून एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढायला सुरुवात केली. यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये अनेकांना आपल्या बॅग सुद्घा नेता आल्या नाही. त्या मैदानात विखुरल्या आहेत. संपकऱ्यांच्या भोजनासाठी आणलेली अन्नधान्यांची पोती सुद्धा आझाद मैदानातच पडून आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.