- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Singer KK : 'हम रहे या ना रहे कल', KK ची 'ही' गाणी कायम यादगार ठरतील

Singer KK Passes Away : प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर केकेंचं (Singer Kk Dies) निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. त्यामुळं गायन विश्वातील आणखी एक सितारा हरपला आहे. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं गायन विश्वावर पुन्हा एकदा शोककळा पसरलीय. कृष्णकुमार कुन्नाथ असं त्यांचं पूर्ण नाव आहे. 23 ऑगस्ट 1968 त्यांचा जन्म झाला होता. ते केके म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते.

केकेंनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली (KK Songs) आहेत. ते त्यांच्या पिढीतील सर्वात अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. काल कोलकाता येथील नझरूल मंच इथं संगीत कार्यक्रमातच त्यांचं निधन झालंय. केके यांचं हम दिल दे चुके सनम मधलं, तडप तडप के इस दिल.. (Tadap Tadap Ke Is Dil) हे गाण तर तुफान गाजलेलंय.

1 'पल' : केके हे 90 च्या दशकातील गायक आहेत. त्यांनी 'प्यार के पल' हे गाणं गावून प्रत्येक तरुणाच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं. 1999 मध्ये आलेल्या 'पल' या अल्बमला संगीतप्रेमींसोबतच संगीत तज्ञांनी भरभरून दाद दिली.

2. 'यारों' : प्यार के पल'नंतर केकेंचं 'यारों' हे गाणंही खूप गाजलं. कित्येक दशकांपूर्वी गायलेलं केकेंचं हे गाणं आजही मैत्रीचं उदाहरण देण्यासाठी गुणगुणलं जातं.

3. 'लबों को' : 2007 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' चित्रपटातील या रोमँटिक गाण्यालाही केकेंनी आपला आवाज दिलाय. त्यांनी हे गाणं इतकं सुंदर गायलंय की, हे गाणं ऐकून तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही.

4. 'छोड़ आये हम वो गलियां' : माचिस चित्रपट हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट तर हिट झालाच, पण या चित्रपटातील 'छोड आये हम वो गल्लियाँ' हे गाणंही प्रचंड गाजलं. आजच्या काळात लोक चित्रपटाचं नाव विसरू शकतात, पण हे गाणं नाही.

5. 'तड़प तड़प के : क्वचितच कोणी असेल, ज्यानं हे गाणं ऐकलं नसेल. हे गाणं ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. इतकं ते सुंदर गायलं गेलंय.

6. 'सच कह रहा है दीवाना' : एक काळ असा होता की, 'रेहना है तेरे दिल में'मधील 'सच कह रहा दीवाना' गाण्याची कॉलर ट्यून सर्वांनी सेट केली होती. ही वेळ निघून गेली, पण आजही हे गाणं कधीच जुनं वाटत नाही.

7. 'बीते लम्हे' : इमरान हश्मीच्या 'द ट्रेन' चित्रपटातील लोकप्रिय गाणं आजही प्रसिध्द आहे, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे केकेचा आवाज. केकेनं आपल्या कारकिर्दीत सर्व प्रकारची गाणी गायली आहेत.

8. 'मेरा पहला पहला प्यार : कोणी आहे का ज्यानं हे गाणं ऐकलं नसेल किंवा ऐकून विसरला असेल? उत्तर नेहमी नाही असंच येईल. केकेनं गायलेलं हे गाणं सदाबहार तर आहेच, शिवाय प्रत्येक पिढीतील तरुणाईच्या प्रेमाबद्दल चांगलं सांगतं.

9 'दिल इबादत' : इमरान हश्मी आणि सोहा अली खान स्टारर यांचा 'तुम मिले' हा चित्रपट थिएटरमध्ये चालू शकला नाही. मात्र, या चित्रपटातील 'दिल इबादत' हे गाणं आजही प्रसिद्ध आहे.

10. 'तू ही मेरी शब है सुबह है' : हे गाणं गँगस्टर चित्रपटातील आहे, जे केकेनं त्याच्या आवाजात गायलंय.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.