sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आहारात 'या' ज्यूसचा समावेश करा

त्वचेच्या आरोग्यासाठी काही ज्यूस प्या असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. काही ज्यूस त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्हाला महागड्या उत्पादनांची गरज भासणार नाही. तुम्ही नैसर्गिक पद्धतीने त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. यासाठी असे काही ज्यूसही आहेत, जे पिल्याने तुमचं सौंदर्य वाढू लागतं. आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही ज्युसबद्दल..

बीटचा रस त्वचेतील रक्ताभिसरण सुधारतो. ज्यामुळे त्वचेची चमक वाढते.

संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे फळ सी जीवनसत्वाने समृद्ध आहे. त्यामुळे संत्र्याचा रस त्वचेतील बॅक्टेरिया आणि संसर्गाच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो.

किवीचा रस पिल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. सोबतच त्वचेच्या समस्याही दूर होतात.

कलिंगडचा रस प्यायल्याने तुमची त्वचा हायड्रेट होते. ज्यामुळे त्वचेवर आर्द्रता राहते आणि चेहऱ्याला ग्लोही येतो.

लिंबू त्वचेसाठी अत्यंत आरोग्यदायी मानले जातो. लिंबूचा रस नियमित प्यायल्याने त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

टोमॅटोचा रस त्वचेसाठी आरोग्यदायी आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या समस्या कमी करतात.

ब्लूबेरीचा रस तुमच्या त्वचेला पोषणही देतो. यामुळे त्वचेला चमक येऊ शकते.