Propose Day 2022 : सोनाली कुलकर्णीला कुणालने वाळवंटात केलं प्रपोज, सिद्धार्थ-मितालीची तर गोष्टच हटके! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनाली कुलकर्णीला कुणालने वाळवंटात केलं प्रपोज, सिद्धार्थ-मितालीची तर गोष्टच हटके!

sonali kulkarni siddharth chandekar rasika sunil Propose story

सध्या सर्वजण प्रेमात आकंड बुडाले आहेत. कारण व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. त्यातला आजचा दिवस तर प्यार का इजहार (Love) करण्याचा दिवस. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी त्याला-तिला कसं प्रपोज (Propose) करायचं, यासाठी कंबर कसली आहे. पण तुम्ही अजून आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज केलं नसेल तर वेळ दवडवू नका. आजचा दिवस त्यासाठी खास आहे. पण जर तुम्हाला आज हिंमत नसेल तर या मराठी सेलिब्रिटींकडे पाहून तुम्ही त्याप्रमाणे आपल्या आवडत्या व्यक्तीला व्हॅलेंटाईन विक ( valentine day) दरम्यान नक्की प्रपोज करू शकता.

सोनाली कुलकर्णी- कुणाल  बेनोडेकर (Sonali Kulkarni - Kunal Benodekar) - सोनाली कुलकर्णीचं लग्न कुणाल बेनोडेकर बरोबर गेल्या वर्षी झालं. तिने साखरपुड्यानंतर त्यांच्या रिलेशनला सहा महिने झाल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून कुणालने कसं प्रपोज केलं ते सांगितलं. त्यात ती म्हणते की,  हाच तो क्षण होता जेव्हा कुणालने प्रपोज केल्यावर मी 'हो' म्हणाले होते. शांतपणे, हळूवारपणे डोळे मिटून मी कुणालचा हात हातात घेतला होता. मी माझ्या हृदयात चालू असलेल्या गोड क्षणांना, माझ्या इच्छांना हो म्हणत होते, असे सोनालीनं सांगितलं. त्यांची जोडी सध्या खूप लोकप्रिय होते आहे. लग्नानंतरचे प्रत्येक सण सोनाली मस्त एन्जॉय करते आहे.

सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकर (Siddharth Chandekar - Mitali Mayekar)- या दोघांच्या मैत्रीची सुरुवात सोशल मीडियावर झाली. दोघांनी इंस्टाग्रामवर चॅटिंग सुरू केले. थोडा वेळ एकत्र घालवल्यानंतर सिद्धार्थने मितालीच्या जवळच्या मित्र-मैत्रीणींसमोर प्रपोज करण्याचा निर्णय घेत सरप्राईज पार्टी प्लॅन केली होती सिद्धार्थने गुडघ्यावर बसून अंगठी घालून मितालीला प्रपोज केले होते. त्यानंतर काही वर्ष दोघं एक्तर राहिले. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी लग्न केले.

रसिका सुनील- आदित्य बिलागी (Rasika Sunil - Aditya Bilagi)- रसिका सुनीलने 2021 ला आदित्य बिलागीसोबत आपण नात्यात असल्याची थेट घोषणाच केली. त्याआधी दोघं रिलेशनशीपमध्ये होते. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली रसिका आणि आदित्य हे एका  पार्टीत एकमेकांना भेटले. त्यांना एकमेकांची कंपनी खूप आवडली. त्यानंतर ते भेटत राहिले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी लग्न केले.

ऋषी सक्सेना- इशा केसकर (Rishi Saxena - Isha Keskar)- ऋषी आणि इशा पहिल्यांदा चला हवा येऊ द्याच्या सेटवर भेटले. त्यानंतर दोघांची मैत्री झाली, दोघांना एकमेकांना भेटणे आवडायचे. इशानेच ऋषीला प्रपोज केलं पण ऋषीने काही काळानंतर तीला हो म्हंटलं. हे दोघं एकमेकांना गेली काही वर्ष डेट करत आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघांनी एकमेकांबरोबर छान काळ घालवला. इशाच्या वडिलांचे निधन झाल्यावरही ऋषीने तिला भक्कम साथ दिली आहे. दोघे सध्या लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.

अभिज्ञा भावे- मेहूल पै ( Abhidnya Bhave- Mehul Pai) -अभिज्ञा आणि मेहुल १६ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते परंतु दोघांच्याही पूर्वीच्या अयशस्वी लग्नांमुळे ते दोघं पुन्हा  लग्न करण्यासाठी तयार नव्हते. अभिज्ञाने लग्न करताना लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, आम्ही गेल्या 15 वर्षांपासून मित्र आहोत. एकमेकांच्या सहवासात एकत्र राहिलो. एकमेकांच्या कंपनीत आम्ही शांतता अनुभवली. त्यामुळे विचारपूर्वक एकमेकांना आधार देण्याचा आणि आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करण्याचा निर्णय घेतला. आयुष्याने आम्हाला प्रपोज केलं, असं तिने म्हटलं आहे.

सुबोध भावे - मंजिरी भावे (Subodh Bhave -Manjiri Bhave) - सुबोध दहा वर्षांचा असताना मंजिरीच्या प्रेमात पडला. मंजिरी तेव्हा 8 वर्षांची होती. सुबोधने पत्र लिहून मंजिरीला प्रपोज केले. मंजिरी 4 दिवसांनी सुबोधला हो म्हणाली. काही वर्षांनी मंजिरी कॅनडाला गेली. सुबोधने थिएटरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. 5 वर्षांच्या लॉंग डिन्सन्स रिलेशनशीप नंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. सुबोध आणि मंजिरी यांनी नुकतीच एकत्र राहून २१ वर्षे पूर्ण केली आहेत.

प्रसाद ओक- मंजिरी ओक (Prasad Oak - Manjiri Oak) - मंजिरी प्रसादच्या अभिनय कार्यशाळेत सहभागी झाली होती. ही कार्यशाळा तीन महिने चालली. त्या काळात दोघे एकमेकांच्या जवळ आले. दोघांपैकी कोणीही कोणाला प्रपोज वा लग्नाची मागणी घातली नाही. पण त्यांच त्यांनाच समजलं की ते एकमेकांबरोबर आयुष्य घालवू शकतात. 7 जानेवारी 1998 रोजी दोघांचे लग्न झाले.