PHOTOS : लग्नाच्या टायमालाही सौरभची 'दादागिरी'; सासुरवाडी झुकलीच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS : लग्नाच्या टायमालाही सौरभची 'दादागिरी'; सासुरवाडी झुकलीच!

Sourav Ganguly Birthday Special Love Story Of Dona Ganguly
भारतीय क्रिकेटमधला दादा म्हणून ओळख असणाऱ्या सौरभ गांगुली आज 50 वर्षाचा झाला. भारतीय संघाचे कर्णधार ते बीसीसीआयचा अध्यक्ष असा जबरदस्त प्रवास सौरभ गांगुलीने केला. जसा त्याचा क्रिकेट आणि क्रिकेट प्रशासक म्हणून प्रवास खूप रंजक आहे तसेच त्याचे कौटुंबिक जीवन देखील खूप रंजक आहे. सौरभ गांगुलीने 1997 मध्ये डोना गांगुलीशी लग्न केले होते. डोना ही ओडिसी डान्सर आहे. या दोघांनी लव्ह स्टोरी ही एका चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही.

सौरभ गांगुली आणि डोना गांगुली हे एकमेकांचे शेजारी होते. मात्र या शेजारधर्मात फार सख्य नव्हते. दोन्ही कुटुंबात वाद होते. असे असतानाही सौरभ गांगुली डोनाच्या प्रेमात पडला. तो कायम डोनाला भेटण्यासाठी कराणे शोधत होता.

सौरभ गांगुली कोठेही जायचं असलं तरी तो डोनाच्या घरावरूनच पुढे जायचा. याचबरोबर बॅडमिंटन खेळताना सौरभ गांगुली मुद्दाम बॅडमिंटनचे शटल डोनाच्या घरात फेकत होता. तो हे फक्त डोनाला पाहण्यासाठी करायचा.

सौरभ गांगुलीची ही प्रेमकहाणी अशीच सुरू राहिली. याचा पुढचा टप्पा म्हणजे दोघे एकमेकांना भेटू लागले. सौरभ गांगुली डोनाबरोबर लग्न करू इच्छित होता.

ज्यावेळी सौरभ गांगुलीने आपल्या मनातील गोष्ट घरच्यांसमोर सांगितली त्यावेळी घरच्यांनी याला विरोध केला. मात्र दादा म्हणजे महाजिद्दी माणूस, अखेर घरचे त्याच्या जिद्दीपुढे झुकले आणि त्यांनी या लग्नाला होकार दिला.

मात्र डोनाचे कुटुंबीय या लग्नाला होकार देत नव्हते. यावरही दादाने एक शक्कल लढवली. सौरभ गांगुली ज्यावेळी 1997 मध्ये इंग्लंडविरूद्ध मालिका जिंकली. त्यानंतर सौरभ गांगुली डोनाला आपल्या एक मित्राच्या घरी घेऊन गेला. तेथे या दोघांनी गपचूप लग्न केले.

डोनाच्या कुटुंबीयांना या गोष्टी माहिती झाल्यानंतर ते खूप नाराज झाले. मात्र काही काळानंतर त्यांनी या दोघांच्या लग्नाला मान्यता दिली. अखेर 1997 मध्ये पारंपरिक पद्धतीने या दोघांचे पुन्हा एकदा लग्न लावून देण्यात आले.