Christmas 2021 : मुलांना भेटवस्तू देताय? ट्राय करा Best Gift Idea | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Christmas : मुलांना भेटवस्तू देताय? ट्राय करा Best Gift Idea

christmas gifts

येत्या काही दिवसातच म्हणजेच (ता. 25) डिसेंबर रोजी ख्रिसमस (christmas)आहे. हा सण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या सणाची सर्वात जास्त वाट लहान मुलांना (children)असते. पण, तेही केवळ भेटवस्तूंपुरतेच (Gifts) राहते. सांताक्लॉज (Santaclaus) कधी येईल आणि कधी भेटवस्तू देईल या आशेवर ते जगतात. या दिवशी, असे लोक ख्रिसमस पार्टी (Christmas party)आयोजित करतात आणि कुटुंब (Family) आणि मित्रांसोबत (Friends) साजरे करतात, परंतु या दिवशी, सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांसाठी भेटवस्तू घेणे. चला तर मग, तुमच्या मुलांना भेटवस्तू देण्यात तुम्हीही विचार करत असाल, तर या गोष्टी एकदा पाहिल्यास तुम्हाला आइडिया येईल.

चॉकलेट (Chocolate):
मुलांना चॉकलेट्स (Chocolates) खूप आवडतात, पण ख्रिसमसला तुम्ही तुमच्या मुलांना चॉकलेट गिफ्ट  (Chocolate gifts)देऊ शकता. ही अशी भेट आहे जी तुमच्या बजेटमध्ये बाजारात सहज उपलब्ध होईल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेली चॉकलेट्सही मुलांना भेट देऊ शकता.

चॉकलेट (Chocolate): मुलांना चॉकलेट्स (Chocolates) खूप आवडतात, पण ख्रिसमसला तुम्ही तुमच्या मुलांना चॉकलेट गिफ्ट (Chocolate gifts)देऊ शकता. ही अशी भेट आहे जी तुमच्या बजेटमध्ये बाजारात सहज उपलब्ध होईल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेली चॉकलेट्सही मुलांना भेट देऊ शकता.

व्हिडिओ गेम्स (Video games):
मुलांना भेटवस्तू (Gifts)देण्यासाठी व्हिडिओ गेम्स (Video games)हा सर्वोत्तम पर्याय. एक म्हणजे सध्या कोरोना ओमिक्रॉन (Omicron) सुरु आहे. त्यामुळे घराबाहेर खेळणे बंद झाले. या कारणास्तव मुलांना कोणत्याही कामात किंवा ऑनलाइन अभ्यासात मन लागत नाहीयेय. व्हिडीओ गेम्स मुलांचे मन गुंतवून ठेवण्यास मदत करतील. यामुळे मुले अॅक्टिव्ह (Active) होतील आणि त्याच वेळी त्यांना घरातील कामे करावीशी वाटतील.

व्हिडिओ गेम्स (Video games): मुलांना भेटवस्तू (Gifts)देण्यासाठी व्हिडिओ गेम्स (Video games)हा सर्वोत्तम पर्याय. एक म्हणजे सध्या कोरोना ओमिक्रॉन (Omicron) सुरु आहे. त्यामुळे घराबाहेर खेळणे बंद झाले. या कारणास्तव मुलांना कोणत्याही कामात किंवा ऑनलाइन अभ्यासात मन लागत नाहीयेय. व्हिडीओ गेम्स मुलांचे मन गुंतवून ठेवण्यास मदत करतील. यामुळे मुले अॅक्टिव्ह (Active) होतील आणि त्याच वेळी त्यांना घरातील कामे करावीशी वाटतील.

गोष्टींची पुस्तकं (Books of stories):
पुस्तक (Books) ही कधीही मुलांसाठी सर्वात भारी भेट ठरते. सध्या वाचन संस्कृती (Reading culture)लोप पावत् चालली आहे. त्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व माहित नाही. हे महत्त्व तुम्ही आपल्या मुलाला पटवून द्या आणि यासाठी पहिलं पाऊल म्हणजे त्याला आवडेल असे पुस्तक त्याला भेट द्या.

गोष्टींची पुस्तकं (Books of stories): पुस्तक (Books) ही कधीही मुलांसाठी सर्वात भारी भेट ठरते. सध्या वाचन संस्कृती (Reading culture)लोप पावत् चालली आहे. त्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व माहित नाही. हे महत्त्व तुम्ही आपल्या मुलाला पटवून द्या आणि यासाठी पहिलं पाऊल म्हणजे त्याला आवडेल असे पुस्तक त्याला भेट द्या.

टेडी बेअर (Teddy Bear):
टेडी बेअर मुलगा असो की मुलगी, मुलं लहान असतील तर दोघांनाही खूप आवडतात. टेडी बेअर (Teddy Bear)ही अशी भेट आहे जी बाजारात सहज उपलब्ध असते. यासोबतच मुलांनाही ते खूप आवडते. म्हणून, आपण मुलांना ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देऊन आनंदित करू शकता.

टेडी बेअर (Teddy Bear): टेडी बेअर मुलगा असो की मुलगी, मुलं लहान असतील तर दोघांनाही खूप आवडतात. टेडी बेअर (Teddy Bear)ही अशी भेट आहे जी बाजारात सहज उपलब्ध असते. यासोबतच मुलांनाही ते खूप आवडते. म्हणून, आपण मुलांना ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देऊन आनंदित करू शकता.

सांता बॅग (Santa bag):
या वर्षीचा ख्रिसमस खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना लहान सांता बॅग (Santa bag)देखील देऊ शकता. या बॅगमध्ये तुम्ही टॉफी (Toffee)
 किंवा इतर कोणतीही भेटवस्तू देऊ शकता. तुम्ही ही भेटवस्तू अगदी सहज घरी तयार करू शकता.

सांता बॅग (Santa bag): या वर्षीचा ख्रिसमस खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना लहान सांता बॅग (Santa bag)देखील देऊ शकता. या बॅगमध्ये तुम्ही टॉफी (Toffee) किंवा इतर कोणतीही भेटवस्तू देऊ शकता. तुम्ही ही भेटवस्तू अगदी सहज घरी तयार करू शकता.

मग (Mag):
ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना मग (Mag)सारखे काहीतरी गिफ्ट करू शकता, ज्यामध्ये ते दूध (Milk), कॉफी (Coffee)आणि चहा (Tea)पिऊ शकतात. मुलांना अशा भेटवस्तू खूप आवडतात. पण, मग सिंपल (Simple)नसावे हे लक्षात ठेवा. त्यावर काही प्रकारचे डिझाइन (Design)केलेले असावे. मगवर बनवलेले कार्टूनचे चित्र मिळते तसे. किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांचा फोटो (Photo)काढू शकता. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल.

मग (Mag): ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना मग (Mag)सारखे काहीतरी गिफ्ट करू शकता, ज्यामध्ये ते दूध (Milk), कॉफी (Coffee)आणि चहा (Tea)पिऊ शकतात. मुलांना अशा भेटवस्तू खूप आवडतात. पण, मग सिंपल (Simple)नसावे हे लक्षात ठेवा. त्यावर काही प्रकारचे डिझाइन (Design)केलेले असावे. मगवर बनवलेले कार्टूनचे चित्र मिळते तसे. किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांचा फोटो (Photo)काढू शकता. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल.