Republic Day : भारताकडे आहेत मानवी शक्तीच्या पलीकडे जाऊन काम करणारे युद्धवीर
जिथे मानवी शक्ती कमी पडते तिथे मानवानेच तयार केलेले यंत्र कामी येते. असेच काहीसे आहे भारतीय सैन्याचे. सैन्यातील जवानांना पूरक ठरू शकतील अशी काही वाहने भारताकडे आहेत.
कोणत्याही शत्रूवर चाल करून जाण्याची आणि त्याला नामोहरम करण्याची ताकद या वाहनांकडे आहे. यापैकी काही वाहने निवृत्त झाली आहेत तर काही आजही सेवेत आहेत.
टाटा सफारी हे वाहन खडबडीत रस्ते, बर्फ, दलदल अशा ठिकाणी सहज चालवता येते. लष्कराच्या विशेष गरजा लक्षात घेऊन हे वाहन तयार करण्यात आले आहे.
दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या जपानला एक बहुउद्देशीय वाहन हवे होते. त्यासाठी निसान पॅट्रोलची निर्मिती करण्यात आली. ६०च्या दशकात हे वाहन भारतीय सैन्यात दाखल झाले. Jabalpur Ordnance And Gun-carriage Assemblyचे संक्षिप्त स्वरूप म्हणून निसान जोंगा असे नाव या वाहनाला देण्यात आले. सध्या हे वाहन निवृत्त झाले आहे.
मारुती सुझुकीची ऑल व्हील ड्राइव्ह जिप्सी १९८५ साली सामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात आली होती. १९९१ मध्ये भारतीय सैन्याने हे वाहन खरेदी केले. यात ४ स्पीड आणि ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स उपलब्ध होता. आता हे वाहन सेवेत नाही.
महिंद्रा एमपीव्ही १ हे वाहन ९० अंश कोनामध्ये १० मीटर अंतरावरील अॅनिमेशन बॉलचा सामना करू शकते. गोळीबार, बॉम्ब ब्लास्ट असे हल्ले हे वाहन झेलू शकते.
महिंद्रा मार्क्समॅन हे वाहन दारुगोळा आणि ग्रेनेड हल्ल्यासाठी सुरक्षित आहे. यातील मशीन गनमधून २७० अंशांमध्ये गोळीबार करता येतो.
भारतीय-चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कल्याणी एम ४ वाहनाचा सैन्यात समावेश करण्यात आला. खडबडीत रस्तयावरही हे वाहन चांगले चालते. तसेच आयईडी ब्लास्ट झेलण्याची आणि १४० किमी प्रतितास वेगाने धावण्याची या गाडीची क्षमता आहे.
महिंद्रा आर्म्ड लाइट स्पेशिलिस्ट व्हेइकल सध्या लष्करी सेवेत आहे. यात एक गन हॅच, रन फ्लॅट सिस्टम, टायर इन्फ्लेशन, एयर फिल्ट्रेशन, स्कॅवेजिंग सिस्टम या सुविधा आहेत. यात ६ ते ८ लोक बसू शकतात.