sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023च्या लिलावात 'या' परदेशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस

ipl 2023

इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 च्या पुढील हंगामासाठी संघांनी तयारी सुरू केली आहे. सर्व फ्रँचायझी संघांनी BCCI ने 15 नोव्हेंबरला राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यावेळी मिनी लिलावात असे काही विदेशी खेळाडू आहेत ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. टी-२० विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली अपेक्षित आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही यामध्ये असणार आहे.

या मिनी लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर सर्व फ्रँचायझींची नजर असणार आहे. हैदराबादचा संघ या इंग्लिश अष्टपैलू खेळाडूसाठी मोठी बोली लावू शकतो. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात त्याने अंतिम फेरीत नाबाद अर्धशतक झळकावून संघाला चॅम्पियन बनवले. त्याच्या या फॉरमॅटमध्ये 533 धावा आणि 25 विकेट्स आहेत.

इंग्लंडचा आणखी एक स्टार सॅम करन ज्यांच्यामुळे संघ दुसऱ्यांदा विश्वविजेता बनू शकला. टी-20 विश्वचषकात 13 विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. आयपीएलमध्ये सॅमने 2019 मध्ये पंजाबकडून खेळताना हॅटट्रिकही घेतली होती. 144 टी-20 सामन्यांमध्ये या गोलंदाजाने 8.48 च्या इकॉनॉमीसह 146 विकेट घेतल्या आहेत.

या लिलावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनवरही फ्रेंचायझी संघाची नजर असेल. या खेळाडूने भारतात टी-20 विश्वचषकापूर्वी खेळल्या गेलेल्या मालिकेत खूप धावा केल्या आहेत. 12 एकदिवसीय सामने खेळल्यानंतर या खेळाडूने एकूण 270 धावा केल्या आणि 12 बळीही घेतले.

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज रिले रुसो वर यावेळी फ्रेंचायझी पैसे गुंतवू शकताता. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात त्याने धडाकेबाज खेळी खेळताना शतक झळकावले. त्याचे या फॉरमॅटमधील हे दुसरे आंतरराष्ट्रीय शतक होते. त्याने 269 टी-20 सामन्यात 6874 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतके आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे.

टॅग्स :IPL