जवळपास मागील सात महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरु आहे. या कालावधीत लालपरीची चाके थांबली. यात फरपट झाली ती सर्वसामान्यांची. लाडकी लालपरी रस्त्यावर धावायची बंद झाली अन् अनेकांची तारांबळ उडाली. तिच्या थांबण्यानं अनेकांची रोजीरोटी थांबली, प्रवास थांबला. आज पुन्हा नव्या जोमानं लालपरीनं धावायला सुरुवात केली आहे. तीचं आगारात पुन्हा येणं, डौलात दिसणं हे सारं सर्वसामान्यांना सुखावणार आहे. त्यामुळं आपसुकचं आली गं बाय माझी परत! असं उद्गार अनेकांच्या तोंडातून ऐकायला मिळाले तर आर्श्चय वाटायला नको. लालपरीच्या आगमनाने हक्काच्या गाडीनं प्रवासाची सोय झाली असल्याचं सुख चेहऱ्यावर सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसतयं. मागील काही महिन्यात एसटी संपादरम्यान अनेक घटना घडल्या. वाद झाले, ते वाद टोकाला गेले. काहींनी याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. या संपापायी काही कर्माचाऱ्यांचा मृत्युही झाला. त्यांचे संसार उघड्यावर पडले. मात्र हे सगळं लालपरीन पाहिलं आणि गंगामाईप्रमाणं सारं पोटात घालून तिनं पुन्हा एकदा धावायला सुरु केलीये. आता फक्त लोकांच्या साथीची तिची अपेक्षा असावी.. ती पुर्ण झाली की मग बस्स
प्रवाशांशी अतूट नाते जपलेली लाल परी आज जिल्ह्यातील दुर्गम भागात पोहचली. संपानंतर आज पहिल्यांदाच धावलेल्या लालपरीचे प्रवाशांनी स्वागत केले.
लवकरच आगारातून एसटीची १०० टक्के वाहतूक सुरू होईल आणि लालपरी पुन्हा सुसाट धावेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला होता.
आज तिच्या आगमनाने अनेकजण सुखावले आहेत. लालपरीतून खूप दिवसांनी प्रवास करायला मिळणार हा क्षणच वेगळा असल्याची काहींची प्रतिक्रिया आहे.
लाल मातीच्या रस्त्याने धावणा-या एसटी बस गाड्या एवढेचे प्रवासी वाहतुकीचे मुख्य साधन असते. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत एसटीने प्रवासी वाहतुकीची सेवा दिली आहे. त्यामुळे एसटी हा विषय सर्वसामान्यांच्या अतिशय जवळचा आहे.
आज लालपरी धावली आणि बस स्थानकांवर काहीशी माणसं पहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून ही संख्या अगदीच तुरळक होती.
राज्यात अनेक परिसरात, ग्रामीण भागांत आज कित्येक महिन्यांनी लालपरी गेली आहे. अनेक महिला कर्मचारी पुन्हा ड्युटीवर जॉईन करताना भावनिक होताना दिसल्या.
सरकारच्या घोषणेनंतरही एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले नव्हते. मुंबईच्या आझाद मैदानात संपात सहभागी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. मात्र आता त्यांनी पुन्हा काहींच्या संख्येन येण्यास सुरुवात केली आहे.
निव्वळ प्रवासी उत्पन्नावर अवलंबून असलेल्या एसटी महामंडळाच्या तिजोरीत खळखळाट आहे. मात्र आता पुन्हा एकदा हे सर्व भरु काढता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
खुप दिवसानं लालपरी धावल्यानं आपसुकचं 'आली गं बाय माझी परत!' असं उद्गार अनेकांच्या तोंडातून ऐकायला मिळाले तर आर्श्चय वाटायला नको.
आता पुन्हा एकदा एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने आगाराकत येत आहेत. कर्मचाऱ्यांना काम देण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याची माहितीही समोर येत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.