sakal

बोलून बातमी शोधा

T20 का किंग कौन? पाहा धावांचा पाऊस पाडणारे Top 5 क्रिकेटपटू!

Chris-Gayle
1) ख्रिस गेल 
वेस्टइंडीजचा आक्रमक आणि विश्वक्रिकेटमध्येही आपल्या तुफान फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचं आकर्षण बनणारा खेळाडू म्हणजे ख्रिस गेल. ख्रिस गेलच्या नावावर अनेक रेकॅार्ड आहेत. गेलला २०-२० क्रिकेट फॅारमॅटचा किंग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. या फॅारमॅटमध्ये गेलच्या नावावर ४ हजार रनांपासून ते १४००० रन वेगाने करण्याचा रेकॅार्ड आहे. गेलने २०-२० क्रिकेटमध्ये ४२३ इनिंग्समध्ये ३७.६३ च्या सरासरीनुसार १४०३८ धावांची कामगिरी केली आहे.

1) ख्रिस गेल वेस्टइंडीजचा आक्रमक आणि विश्वक्रिकेटमध्येही आपल्या तुफान फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचं आकर्षण बनणारा खेळाडू म्हणजे ख्रिस गेल. ख्रिस गेलच्या नावावर अनेक रेकॅार्ड आहेत. गेलला २०-२० क्रिकेट फॅारमॅटचा किंग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. या फॅारमॅटमध्ये गेलच्या नावावर ४ हजार रनांपासून ते १४००० रन वेगाने करण्याचा रेकॅार्ड आहे. गेलने २०-२० क्रिकेटमध्ये ४२३ इनिंग्समध्ये ३७.६३ च्या सरासरीनुसार १४०३८ धावांची कामगिरी केली आहे.

२) कायरन पोलार्ड 
T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कुटणाऱ्या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने याच फॅारमॅटमध्ये तब्बल ४८४ इनिंग खेळल्या आहेत. ३१.६८ सरासरीने त्याने १०८३६ धावा केल्या आहेत.  पोलार्डने एक शतक आणि ५४ अर्धशतक ठोकले आहेत.

२) कायरन पोलार्ड T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कुटणाऱ्या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने याच फॅारमॅटमध्ये तब्बल ४८४ इनिंग खेळल्या आहेत. ३१.६८ सरासरीने त्याने १०८३६ धावा केल्या आहेत. पोलार्डने एक शतक आणि ५४ अर्धशतक ठोकले आहेत.

३) शोएब मलिक 

पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शोएब मलिकच्या नावावरही २०-२० क्रिकेटमध्ये रेकॅार्ड करणारा खेळाडू म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. शोएबने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. मलिकने याच फॅारमॅटमध्ये ३९७ इनिंगमध्ये ३७.०३ च्या सरासरीनुसार १०७४१ धावांची मजल मारली  आहे.

३) शोएब मलिक पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शोएब मलिकच्या नावावरही २०-२० क्रिकेटमध्ये रेकॅार्ड करणारा खेळाडू म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. शोएबने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. मलिकने याच फॅारमॅटमध्ये ३९७ इनिंगमध्ये ३७.०३ च्या सरासरीनुसार १०७४१ धावांची मजल मारली आहे.

४) डेविड वॅार्नर 

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर खेळाडू डेविड वॅार्नर बिग बॅश लीग आणि IPLमध्ये आक्रमक फलंदाजी करताना आपण दरवर्षी पाहतो. सर्व २०-२० क्रिकेटच्या फॅारमॅटमध्ये एक सक्रिय खेळाडू म्हणून वॅार्नरला ओळखलं जातं. याच फॅारमॅटमध्ये ३७.८ च्या सरासरीनुसार १००१७ धावा करण्याचा रेकॅार्ड वॅार्नरच्या नावावर आहे.

४) डेविड वॅार्नर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर खेळाडू डेविड वॅार्नर बिग बॅश लीग आणि IPLमध्ये आक्रमक फलंदाजी करताना आपण दरवर्षी पाहतो. सर्व २०-२० क्रिकेटच्या फॅारमॅटमध्ये एक सक्रिय खेळाडू म्हणून वॅार्नरला ओळखलं जातं. याच फॅारमॅटमध्ये ३७.८ च्या सरासरीनुसार १००१७ धावा करण्याचा रेकॅार्ड वॅार्नरच्या नावावर आहे.

५) विराट कोहली 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी करत असतो. क्रिकेटच्या सर्वच फॅारमॅटमध्ये विराटचा दबदबा आहे. T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत २०-२० क्रिकेटमध्ये ४१.८६ च्या सरासरीनं ९९२२ धावा कुटल्या आहेत.

५) विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी करत असतो. क्रिकेटच्या सर्वच फॅारमॅटमध्ये विराटचा दबदबा आहे. T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत २०-२० क्रिकेटमध्ये ४१.८६ च्या सरासरीनं ९९२२ धावा कुटल्या आहेत.