sakal

बोलून बातमी शोधा

Photo : 'कई झूठे इकठ्ठे हों, तो..' शेलैश लोढाच्या पोस्टने वाद चिघळणार?

taarak mehta ka ooltah chashmah shailesh lodha dispute

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah : गेल्या काही दिवसांपासून बातमी होती की तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये 'तारक मेहताची' भूमिका करणारे शैलेश लोढा(Sailesh Lodha) यांनी मालिकेला रामराम केला आहे. शैलेश लोढा हे मालिकेतील आपल्या ट्रॅकविषयी खूश नाहीत असं कारण त्यावेळी सांगितलं गेलं होतं. शूटिंगच्या तारखा आणि कामाचे तास यावरनं देखील प्रॉडक्शन हाऊस सोबत त्यांचा वाद सुरु असल्याची चर्चा होती. पण मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी शैलेश लोढा यांच्या मालिका सोडण्याच्या बातमीत काही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. एकीकडे हा वाद सुरू असतानाच शैलेशी लोढा यांनी एक पोस्ट इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सूचक मजकूर लिहिला असून 'तारक मेहता' मालिकेतील वाद वाढणार असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे.

२८ जुलै २००८  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, तारक मेहता, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

जवळपास १३ वर्षांहून अधिक काळ ही सर्व मंडळी एकत्र काम करत आहे. शैलेश लोढा मालिका सोडणार असल्याचे कळताच चाहत्यांनी त्यांना थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निर्मात्यांकडून हा वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरु असले तरी शैलेश  यांची नाराजी मात्र  उघड पणे दिसून येत आहे.

हसीब सोज़ साहब का एक शेर कमाल का है.. "यहाँ मज़बूत से मज़बूत लोहा टूट जाता है, कई झूठे इकठ्ठे हों, तो सच्चा टूट जाता है'' अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. या पोस्टमुळे नेमकं असत्य काय, सत्य काय, काय घडलं असावं अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

शैलेश लोढा केवळ अभिनेतेच नाही तर उत्तम कवी आणि लेखक आहेत. हिंदी साहित्य क्षेत्रात त्यांच्या नावाचा आणि कवितांचा बराच दबदबा आहे.  २००७ मध्ये ते कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि २००८ पासून त्यांचा 'तारक  मेहता' म्हणून प्रवास सुरु झाला.

या मालिकेत याआधी दया बेन, सोडी,रोशन ,अंजली भाभी अशा बऱ्याच पात्रांनी एक्झिट घेतली होती. त्यातील काही कलाकार परत आले पण दया बेन म्हणजेच दिशा वाकाणी काही परत आल्या नाहीत. त्यामुळे आता शैलेश यांच्या जाण्याने 'तारक मेहता'च या मालिकेतून जाणार का अशी चिंता चाहत्यांनी व्यक्त केली आहे.