Cricketer Love Story: या स्वप्नसुंदरीच्या प्रेमात पडला होता राहुल चहर, समुद्रकिनाऱ्यावर केलं रोमँटिक लग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricketer Love Story: या स्वप्नसुंदरीच्या प्रेमात पडला होता राहुल चहर, समुद्रकिनाऱ्यावर केलं रोमँटिक लग्न

Cricketers Love Story: Rahul Chahar And Ishani Johar love story

टीम इंडियाचा क्रिकेटर राहुल चाहर त्याच्या दमदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचे क्रिकेटचे किस्से तर जगभऱ्यात गाजलेच पण त्याचबरोबर त्याची लव स्टोरीही चांगलीच गाजलेली आहे. याच वर्षी या खेळाडूने त्याच्या लाँग टाईम गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. २३ वर्षीय लेग स्पिनर राहुल चाहरच्या मनावर राज्य करणारी ही सुंदरी आहे तरी कोण ? चला तर जाणून घेऊया राहुल चहरची फिल्मी लव स्टोरी.

लेग स्पिनर राहुल चाहरच्या पत्नीचे नाव आहे ईशानी जौहर. अनेक वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. ९ मार्च २०२२ ला गोव्याच्या शानदार वेडिंग डेस्टिनेशनवर या दोघांनी लग्न केलं.

राहुल चाहर आणि ईशानी जौहर यांचा २०१९ मध्ये साखरपुडा झाला होता. ईशानी जौहर ही प्रोफेशनल फॅशन डिझाईनर आहे.  अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

राहुल चाहर सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. पत्नी ईशानीसोबत तो अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतो. एकमेकांचं प्रेम हे दोघेही उघडपणे जगासमोर त्यांच्या रोमँटिक फोटोद्वारे व्यक्त करताना दिसतात.

२३ वर्षीय लेग स्पिनर राहुल चाहरने भारतासाठी ६ टी २० सामना खेळला आहे. यामध्ये त्याने ७ विकेट काढल्या होत्या. तसेच २०२१ मध्ये श्रीलंकेविरूद्ध एकमेव वनडे सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने ३ विवेट काढल्या होत्या.