Benefits of Wearing Gold Jewellery: सोन्याचे दागिने घालणं आपल्या देशात सामान्य गोष्ट आहे. कोणताही सण, समारंभ किंवा विवाह सोहळा असो, भारतीय स्त्रिया अशा प्रसंगी सोन्याचे दागिने घालतात. अलीकडच्या काळात पुरुषही मोठ्या प्रमाणात सोनं वापरतात. पंरतु सोनं केवळ महिलांचे सौंदर्यच वाढवत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. जुन्या काळातही अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी सोन्या-चांदीचा वापर केला जात असे. अॅक्युपंक्चर विशेषज्ञ देखील वेदना कमी करण्यासाठी सोन्याचे टोक असलेल्या सुया वापरतात. यासाठी तुम्हाला खूप दागिने घालावे लागतील, असंही नाही. दैनंदिन जीवनात सोन्याचे झुमके, कानातले किंवा अंगठ्या इत्यादी घातल्याने देखील तुम्हाला अनेक फायदे होतील.
1. काही अभ्यासात असे दिसून आले आहे की शुद्ध सोन्यात अँटी इंफ्लेमेंट्री गुणधर्म असतात, जे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
2. खऱ्या सोन्याचे दागिने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात आणि त्यामुळे आपल्याला संसर्गापासून संरक्षण मिळते.
3. शरीरातील जखमांवर उपचार करण्यासाठीही सोन्याचा वापर केला जातो. जेव्हा जखमेवर सोने लावले जाते तेव्हा ते संक्रमणास प्रतिबंध करते आणि त्यावर योग्य उपचार देखील करते.
4. सोने तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. सोने त्वचेला गरमी आणि व्हायब्रेशन देते जे शरीरातील पेशींचे पुनरुत्पादन करण्यास मदत करते. याशिवाय अनेक स्किनकेअर आणि सौंदर्य उत्पादनांमध्येही सोन्याचा वापर केला जातो.
5. रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) काळात जाणाऱ्या महिलांसाठी सोन्याचे दागिने घालणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. या कठीण दिवसांत येणाऱ्या समस्यांपासून त्यामुळे आराम मिळू शकतो.
6. कानात सोन्याचे झुमके आणि बाळ्या घातल्याने स्त्रीरोग, कानाचे आजार, नैराश्य इत्यादींपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.
7. सोने धारण केल्याने मनाची एकाग्रताही वाढते. यासाठी तर्जनीमध्ये सोने धारण करावे.
8. सोन्याच्या वापरामुळे अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्ती मिळण्यासही मदत होते. नशेची सवय कमी करण्यासाठी औषधांमध्ये सोन्याचा वापर केला जातो.7. सोने धारण केल्याने मनाची एकाग्रताही वाढते. यासाठी तर्जनीमध्ये सोने धारण करावे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.