sakal

बोलून बातमी शोधा

Photo: साऊथचेच चित्रपट भारी नसतात, बॉलीवूडचे 'हे' चित्रपट साऊथमध्ये ठरलेत हीट

these bollywood hindi movies get hit in south films industry

सध्या साऊथच्या चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळत आहे. या वर्षी प्रदर्शित झालेले बहुतेक दाक्षिणात्य चित्रपट जगभरात सुपरहिट ठरले. पण यावरून, हिंदीमध्ये चांगला आशय निर्माणच होत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. कारण आत्तापर्यंत असे अनेक हिंदी चित्रपट बनले आहेत ज्यांनी दक्षिण भारतात आपलीन दमदार छाप पाडली. टॉलीवुडला वेड लावणारे हे हिंदी चित्रपट नक्की कोणते ते पाहूया..

जब वी मेट- शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'जब वी मेट' हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. आजही लोकांना हा चित्रपट टीव्हीवर पाहायला आवडतो. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट साऊथमध्येही बनला आहे. दक्षिण भारतातही त्याचा रिमेक चांगलाच गाजला.

दबंग- सलमान खानच्या सध्याच्या स्टारडममागे त्याच्या दबंग चित्रपटाचा मोठा हात आहे. या चित्रपटातील कॉमेडीसह त्याची जबरदस्त अॅक्शन लोकांना आवडली होती. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटातही बनला आहे. तेलुगूमध्ये त्याचा 'गब्बर सिंग' म्हणून रिमेक करण्यात आला. ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

दिल्ली बेली - आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला दिल्ली बेली हा चित्रपट आजही त्याच्या कथेमुळे लक्षात आहे. हिंदीत सुपरहिट झाल्यानंतर हा चित्रपट दक्षिणेत आला. तिथेही या चित्रपटाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

3 इडियट्स - आमिर खानचा 3 इडियट्स हा हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामुळे आमिर देशातच नाही तर परदेशातही खूप प्रसिद्ध झाला. या चित्रपटाचे जबरदस्त यश पाहून साऊथमध्येही त्याचा रिमेक करण्यात आला जो सुपरहिट ठरला.