आईच्या ममतेनं भावूक करणारी ही बॉलीवूड गाणी ऐकलीत ? ऐकून येईल डोळ्यांत अश्रू
गाणी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील विरंगुळा म्हणून ऐकण्याचा भाग असला तरी गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडतात.गाण्याचा प्रभाव मनात खोलवर परिणाम करण्यापासून ते श्रोत्यांना हसवण्यापर्यंत असतो.काही श्रोत्यांना गाणी ऐकून जोश येतो तर काही जण भावूक होतात.आज मदर्स डे.या दिवशी ही काही गाणी तुमच्या मनातील मातृत्वाची भावना आणखी तीव्र होतील.
'तारे जमी पर' या चित्रपटातले 'मा' हे गाणे एका बोर्डींग स्कूलमधे शिकणाऱ्या मुलाची व्यथा सांगतं.आईपासून दूर राहत असलेल्या एका मुलाने हे गाणे त्याच्या आईच्या आठवणीत गायले होते.
'राजा और रंक' या चित्रपटातलं 'तू कितनी अच्छी है' हे गाणं ऐकताच श्रोते भावूक होतील असे हे गाणे आहे.१९६८ मधील लता दीदींनी म्हटलेल्या या गाण्यात आईच्या ममतेची काया आहे.हे गाणं ऐकून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात.
'लुका छुपी' हे रंग दे बसंती या चित्रपटातील गाणे लता मंगेशकर यांनी २००६ मधे गायले होते.या चित्रपटातील आर माधवनचा एका प्लेन अॅक्सिडेंटमधे मृत्यू होतो.त्यावेळी हे गाणं लागतं.या गाण्याने अनेकांचे दु:ख अनावर झाले आहे.
'ऐसा क्यू मा' हे प्रसिद्ध नीरजा या चित्रपटातील गाणं आहे.या चित्रपटासाठी अभिनेत्री सोनम कपूरला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.या गाण्यातून नीरजा आणि तीच्या आईच्या अतूट प्रेमाचं नातं दर्शवल्या गेलं आहे.
'मा मेरी मा' हे गाणं राहुल वैद्य या सिंगरने म्हटलं आहे.'बीग बॉस १४' फेम राहुलने 'मदर्स डे' च्या निमित्तानं हे गाणं म्हटलं आहे."मै गलती जो करता हू..उसे माफ तुम करती हो.. ओ मा ओ मा" असे या गाण्याचे बोल आहेत.